Vegetable prices in state on the rise onion tomato prices fluctuate
पणजी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. कांदा टोमॅटोचे दर वरखाली होत आहेत. काही प्रमाणात फळभाज्यांचे दर आवाक्यात असून पालेभाज्या मात्र अधिक भाव खात आहेत. पणजी बाजारात लाल, मुळा व इतर पालेभाज्या ५० रुपयांना तीन जुडी दराने विकली जात आहेत.
अनेक नागरिक बेळगावहून येणाऱ्या पालेभाज्यांपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाज्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. मागील आठवड्यात टोमॅटोच्या दराने पन्नाशी गाठली होती, परंतु आज पणजी बाजारात ४० रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे. कांदा ६० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत तर बटाटे ५० रुपये किलो दराने विकले जात आहे. फळभाज्यांचे दर मागील आठवड्यापासून स्थिर आहेत.
मागील तीन -चार महिन्यांपासून वाढलेल्या लसणाच्या दराचा भडका कायम असून ३५० ते ४०० रुपये प्रती किलो दराने लसणाची विक्री केली जात आहे. शेवग्याची जुडी १०० रुपये प्रती जुडी दराने विकली जात आहे. आता हिवाळ्यात शेतकऱ्यांकडून नव्याने भाजीपाला लागवड करण्यात आलेली भाजी बाजारात सकाळी मोठ्या प्रमाणात शेतकरी घेऊन येतात. या भाजीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
बाजाराच्या तुलनेत गोवा फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर भाज्यांचे दर कमी आहेत. टोमॅटो २३ रुपये प्रती किलो दराने विकला जाते. तर कांदे ४०, बटाटा ३५ गाजर ४७ रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत त्यामुळे खुल्या बाजारापेक्षा अनेक विक्रेते या गाळ्यांमधून भाजी खरेदी करणे पसंत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.