Goa Vegetable Rates
Vegetable Price In GoaDainik Gomantak

Goa Vegetable Rates: दिलासा! कांद्याचे दर उतरले निम्म्यावर; अन्य भाज्यांचे दरही नियंत्रणात

Goa Vegetable Price: कांद्याचे दर हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचा भाव आता निम्म्यावर आला आहे.
Published on

Vegetable Price In Goa

डिचोली: दैनंदिन आहारातील घटक असलेला कांदा आता स्वस्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कांद्याचे दर हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचा भाव आता निम्म्यावर आला आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहक गृहिणींच्या चेहऱ्यावर आता किंचितसे हास्य दिसून येत आहे.

डिचोलीच्या आठवडी बाजारात अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात होते. गेल्या महिन्यात दरवाढीच्या दिशेने वाटचाल करीत असलेला कांदा आता उतरला आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीस ६० रुपये किलो असलेला कांदा अचानक महाग झाला होता. बावीस दिवसांपूर्वी कांदा शंभरीवर पोचला होता. त्यामुळे गृहिणींच्या डोळ्यात अश्रू दिसून येत होते.

Goa Vegetable Rates
Goa Cricket: 'जीसीए' आमसभा न्यायालयाच्या आदेशानुसार; उच्च न्यायालय वकिलांच्या निरीक्षणाखाली होणार बैठक

डिचोलीच्या आठवडी बाजारात ५० रुपये किलो असे कांद्याचे दर होते. दुसऱ्या बाजूने लसूणच्या दरातही किंचित घट झाली आहे. ४८० रुपये किलो झालेली लसूण आता ४०० रुपयांवर आली आहे. लसूण महाग झाल्यानंतर लसूणच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे.

भाज्यांच्या दरात चढउतार होत होती. काही भाज्या ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्या होत्या. मात्र आता बाजारात भाज्यांचे दर नियंत्रणात असल्याचे जाणवत आहे.

Goa Vegetable Rates
Kadamba Smart Card: गोव्यात आता 'स्मार्ट' प्रवास! कदंबाच्या कार्डचे अनावरण; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत

बटाटा ५० रुपये!

टोमॅटो आणि बटाटा ५० रुपये किलो असे दर झाले आहेत. वालपापडी, चिटकीमिटकी आदी भाज्यांचे ८० ते १२० रुपये किलो असे दर आहेत. कांद्याची आवक वाढल्याने कांदा स्वस्त झाला असून, आणखी काही दिवस तरी कांदा स्थिर राहणार. असा अंदाज बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. सध्या कांद्यासह बाजारात भाज्यांची आवक समाधानकारक आहे, असे हनुमंत शिरूर रेड्डी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com