Goa BJP
Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजप प्रचारासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातील नेते

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

गोव्यासाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी येत्या आठवड्यात जाहीर होणार आहे. उत्तर गोव्‍यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावांची तर दक्षिण गोव्यासाठी दक्षिण भारतातील नेत्यांची नावे प्रदेश पातळीवरून सुचवण्यात आली आहेत.

कर्नाटक, राजस्थान, गुजरातमधील काही नेते त्या त्या प्रदेशातील; पण गोव्यात स्थानिक मतदारांशी संवाद साधण्यासाठी भाजप पाचारण करणार आहे. त्याचे नियोजन करून दिल्लीला पाठविले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा समावेश तूर्त महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीत असला तरी त्यांच्याकडे आणखी चार राज्यांतील प्रचाराची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुढील आठवड्यानंतर राज्यातील प्रचारात सहभागी होणे तसे कठीण होणार आहे. सध्या प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री दिवसाआड दक्षिण गोवा दौरा उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासह करत आहेत.

तानावडे यांनी आज साळगाव तर दक्षिण गोव्यातील सावर्डे मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. उद्या ते मडगाव फातोर्डा आणि नावेली मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

निवडणुकीत हायटेक प्रचार

भाजपने प्रत्येक मतदाराच्या मोबाईलवर पक्षाचा संदेश पोचवणारी हायटेक यंत्रणा पणजी मुख्यालयाजवळ उभारली आहे. पूर्वी एसएमएस पाठवले जायचे. आता त्यांची जागा व्हॉटस ॲप संदेशांनी घेतली आहे. भाजपने प्रत्येक मतदाराचा व्हॉटस ॲप क्रमांक नोंदवून घेतला आहे. त्याची जोड प्रचाराला दिली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Murder Case : मालगाडीत झोपले अन् कर्नाटकात पोचले; मराठे खून प्रकरणातील संशयितांचा सिनेस्टाईल प्रवास

Karnataka: 'ते हिंदूंचा द्वेष करतात', काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट करणाऱ्या 'मुंबईच्या डॉन'ला गोव्यातून अटक

Goa Today's Live News: बाणावली जिल्हा पंचायतीचीसाठीची पोट निवडणूक जाहीर!

Bicholim News : चित्रकारांना पाठिंबा द्या : चंद्रकांत शेट्ये

Iran President Ibrahim Raisi Death: ‘’तेहरानचा कसाई...’’, इराणी राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूवर इस्रायली मीडियाची आगपाखड!

SCROLL FOR NEXT