Goa Congress: राज्यात काँग्रेसवर अर्थसंकट

Goa Congress: बँक खाती गोठवल्याचा परिणाम : उमेदवारही ठरेनात; नेत्यांची तोंडे दाही दिशेला
Goa Loksabha Congress
Goa Loksabha CongressDainik Gomanatk
Published on
Updated on

Goa Congress:

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेससमोर गहिरे अर्थसंकट उभे ठाकले आहे. दिल्लीतून या निवडणुकीसाठी प्रदेश पातळीवर कोणत्याही प्रकारे अर्थसाहाय्य मिळण्याची शक्यता अत्‍यंत धूसर झाली आहे.

कॉंग्रेसची राष्ट्रीय पातळीवरील सर्व बॅंक खाती गोठविण्यात आली असून प्राप्तीकर खात्याने १ हजार ७०० कोटी रुपये प्राप्तीकर भरण्यासाठी कॉंग्रेसला नोटीस बजावली आहे. या साऱ्याचे प्रतिबिंब गोव्यातील दोन्ही उमेदवार ठरविण्याच्या निर्णयावर पडू लागले आहे.

निवडणुकीला अवघेच दिवस राहिले असतानाही आर्थिक संकटामुळेच कॉंग्रेसने अद्याप राज्यात प्रचाराला सुरवात केलेली नाही.

Goa Loksabha Congress
Goa Weather Update: राज्यात तुरळक पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33 अंशांवर

प्रदेश पातळीवरून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गट समिती पातळीवर लोकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केल्याचे सांगण्यात येत असले, तरी अशा गाठीभेटींचे एकही छायाचित्र अद्याप पक्षाने अधिकृतपणे उपलब्ध केलेले नाही. अन्य एका पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने कॉंग्रेसला निदान पक्षचिन्ह

हाच उमेदवार मानून प्रचारास सुरवात करा, असे सुचवले असता त्यासाठी खर्च करावा लागतो, असे त्याला उलट सुनावण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, काँग्रेसची सातवी यादी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. मात्र, त्यातही गोव्यातील उमेदवारांची नावे नव्हती.

Goa Loksabha Congress
Goa Business Growth: गोवा-कर्नाटकांतील उद्योजकांत सामंजस्य करार

धनवान नेतृत्वाचा शोध

काँग्रेसचे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील दोन उमेदवार ठरविण्यात दिल्लीश्‍वरांना अद्याप यश आलेले नाही. काँग्रेस पक्षाच्या आर्थिक खात्यांवर निर्बंध आल्याने पक्षाकडून निवडणुकीसाठी निधी येईल की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वखर्चाने निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या नेतृत्वाचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील गटातटाचे राजकारणही अद्याप काही थांबलेले नाही. त्यामुळे अनेक नेत्यांची तोंडे दाही दिशेला असल्याचे सध्याचे चित्र आहे.

पक्षांतर्गत बंडाळी उफाळून येण्याचा धोका

काहींच्या म्हणण्यानुसार अमित पाटकर आणि युरी आलेमाव यांनी उत्तर गोव्यातून ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांची नावे उमेदवारीसाठी सुचवली आहेत. मात्र, त्याला चोडणकर गटाचा आक्षेप आहे. हे दोन गट सध्या दृश्य स्वरूपात दिसत असले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसमधील सध्या सुप्तावस्थेत असलेली बंडाळी उफाळून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

...म्हणून उमेदवारीला विलंब

एका बाजूला काँग्रेसने पक्षाच्या आर्थिक स्थितीबाबत सर्व राज्यांतील प्रदेश समित्यांना परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यामुळे पक्षापुढे आर्थिक संकट असल्याचे स्पष्ट होत आहे. आता उमेदवार निवडायचा झाल्यास आर्थिक सक्षम असलेल्या उमेदवाराची निवड करणे आवश्‍यक आहे. पक्षाकडून निधी येईल की नाही, याची शाश्‍वती दिल्लीश्‍वरांनीही दिलेली नाही. त्यामुळेच उमेदवार ठरविण्यास विलंब होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com