फोंडा: शिरोडा येथील पत्नीच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चेतन गावकर या सरकारी कर्मचाऱ्याला दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला एलडीसी (Lower Division Clerk) पदावरुन निलंबित करुन मोठा दणका दिला. अटकेनंतर 48 तास उलटल्याने शासकीय नियमांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चेतन गावकर याला काही दिवसांपूर्वी फोंडा (Ponda) पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अटक केली होती. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण हत्या असल्याचे संकेत मिळाल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलली. गावकर सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांविषयीच्या सेवा नियमांनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याला गुन्हेगारी प्रकरणात अटक होऊन 48 तासांहून अधिक कालावधीपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले, तर त्याला तत्काळ निलंबित करणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी चेतन गावकरला निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
फोंडा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून मृत महिलेच्या (Women) कुटुंबीयांकडूनही महत्त्वपूर्ण माहिती मिळत असल्याचे सूत्रांकडून समजते. या खूनामागील नेमका उद्देश आणि घटनाक्रम उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचे पथक कामाला लागले आहे. या घटनेने शिरोडा परिसरात मोठी खळबळ माजली असून सरकारी सेवकाकडून अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.