पंधरा लाख रुपये ओव्हेल्टी रक्कम न्यायालयात जमा केल्याचे कथित भासवून व न्यायालयाची बनावट पावती तयार करून न्यायालयासह आपल्या अशिलांची फसवणूक प्रकरणातील संशयित अॅड. विश्राम ताळगावकर (म्हापसा) यास म्हापसा पोलिसांनी अखेर अटक केली.
हा प्रकार 11 सप्टेंबर 2017 रोजी घडला होता. म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश शिल्पा पंडित यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 12 एप्रिल २०२२ रोजी याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात वंदना अनंत पळ यांनी २०१०मध्ये वारस हक्क (इन्व्हेंटरी प्रक्रिया) खटला दाखल केला होता.
या खटल्यानुसार, पळ यांनी अरविंद देसाई व विना देसाई या आपल्या नातेवाईकांना १५ लाख रुपये ओव्हेल्टी रक्कम द्यायची होती. सप्टेंबर २०१७मध्ये वंदना पळ यांनी वरील ओव्हेल्टी रक्कम न्यायालयात जमा करण्यासाठी आपला वकील संशयित अॅड. विश्राम ताळगावकर यांच्याकडे दिली. त्याने ती रक्कम न्यायालयात जमा केल्याचे सांगून रक्कम जमा केल्याची पावती पळ यांच्याकडे दिली. या पावतीवर ११ सप्टेंबर २०१७ अशी तारीख होती.
संशयिताला पोलिस कोठडी
न्यायालयाने हा प्रकार समजताच या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली. तसेच २१ साक्षीदारांसह या प्रकरणाचा अहवाल जिल्हा न्यायालयाला सादर केला. त्यानंतर न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी न्यायालय तसेच खटल्यातील स्वारस्य पक्षांची फसवणूक व बनावटगिरी प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.