Lavoo Mamledar Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar: 2012 सालच्या निवडणुकीत 'जायंट किलर’ ठरलेले लवू मामलेदार! निःस्पृह राजकारणी

Lavoo Mamledar Death News: लवू मामलेदार हे आमच्या फोंडा मतदारसंघाचे पाच वर्षे आमदार होते. आमदार होण्यापूर्वी ते पोलिस उपअधीक्षक होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

लवू मामलेदार हे आमच्या फोंडा मतदारसंघाचे पाच वर्षे आमदार होते. आमदार होण्यापूर्वी ते पोलिस उपअधीक्षक होते. पण एवढी मोठी हुद्याची नोकरी सोडून २००७ साली त्‍यांनी राजकारणात उडी घेतली. त्यावेळी त्यांना विद्यमान आमदार रवी नाईक यांच्याकडून पराभव स्‍वीकारावा लागला तरी हिम्मत सोडली नाही. २०१२ साली ते भाजप-मगो युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आणि तेव्हा गृहमंत्री असलेल्या रवींचा त्यांनी तब्बल अडीच हजार मतांनी पराभव केला. या विजयामुळे लवू हे ‘जायंट किलर’ ठरले. त्यांच्याभोवती एक प्रकारचे वलय निर्माण झाले.

त्यावेळी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मगोला दोन मंत्रिपदे दिली होती. खरंतर सुदिन यांच्‍याबरोबर फोंड्याचे आमदार असलेल्या लवूंना मंत्रिपद मिळेल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. पण लवूंऐवजी हे मंत्रिपद प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांना दिल्यामुळे त्यावेळी थोडा वादही निर्माण झाला होता. पण लवू यांनीच आपल्याला मंत्री होण्यात रस नसल्याचे सांगून या वादावर पडदा टाकला होता.

लवूंच्या अल्प राजकीय कारकिर्दीचा विचार केल्यास त्यांना निःस्पृह राजकारणी’ अशीच उपाधी द्यावी लागेल. त्यांनी कधीच सुडाचे राजकारण केले नाही. मी आणि लवू बालपणाचे दोस्त. फोंड्याच्या आल्मेदा हायस्कूलमध्‍ये शिकत असताना आम्ही त्यांच्या दुर्गाभाट येथील घरी खेळायला जायचो.

पण राजकारणात मात्र आम्ही विरोधात होतो. मी रवींच्या ‘कॅम्प’मध्ये असल्यामुळे प्रचारसभेत म्हणा वा पत्रकाद्वारे म्हणा, आमच्यात ‘तू-तू, मै-मै’ व्हायचे. पण लवूंनी ही गोष्ट कधीच मनावर घेतली नाही. उलट कधी भेटला तर ‘मिलिंद तू मला विसरलास’ असे म्हणत हसायचा. गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात तर त्यांनी या गोष्टीचा जाहीर उल्लेख केला होता.

२०१७ साली लवूंचा दारुण पराभव झाला. रवींचा मोठा विजय झाला म्हणून एका डोळ्यात हसू तर मित्राचा पराभव झाला म्हणून एका डोळ्यात आसू अशी माझी स्थिती झाली होती. पण नंतर लवू राजकीयदृष्ट्या घसरायला लागला.

मगोशी खास करून सुदिन ढवळीकर यांच्‍याशी घेतलेला पंगा, काँग्रेसमध्ये जाऊन मडकईतून रिंगणात उतरण्याचा घेतलेला निर्णय यातून त्यांचा घसरत चाललेला राजकीय आलेख प्रतीत होतो. २०२२ साली मडकई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर मिळालेली साडेनऊशे मते त्यांच्या राजकीय पतनाची साक्ष देतात.

तसे लवू कोणत्याही अँगलमधून परिपक्व राजकारणी कधी वाटलेच नाहीत. पण त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या वाट्याला जो काही काळ आला, त्यात प्रामाणिकपणे राजकारण केले हेही कोणी नाकबूल करू शकणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या रुद्रेश्‍‍वर यात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर पडदा पडला असे वाटत असले तरी आयुष्यावर एवढ्या लवकर आणि तोही अशाप्रकारे पडदा पडेल असा विचार कोणी स्वप्नातही केला असेल. पण शेवटी ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच खरे. या निःस्पृह राजकारण्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

लवू मामलेदार हे माझे चांगले मित्र होते. एक प्रामाणिक पोलिस अधिकारी, एक उत्तम गृहस्थ आणि एक समर्पित राजकारणी होते. कायदा अंमलबजावणी आणि सार्वजनिक सेवेतील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. त्यांच्या आत्म्याला सद्‌गती मिळो, ही प्रार्थना.
माविन गुदिन्हो, पंचायतमंत्री
लवू मामलेदार यांचा बेळगावात मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.
युरी आलेमाव, विरोधी पक्षेनेते
माजी आमदार लवू मामलेदार यांच्‍या आकस्‍मिक मृत्‍यूचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या दुःखात आम्‍ही सहभागी आहोत. मामलेदार यांच्‍या आत्‍म्‍याला चिरशांती मिळो, ही ईश्‍‍वरचरणी प्रार्थना.
नरेंद्र सावईकर, माजी खासदार
लवू मामलेदार यांचे अचानक जाणे मन हेलावून टाकणारे आहे. त्यांनी गोव्याच्या राजकारणात आणि पोलिस दलात दिलेले योगदान मौल्यवान आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पेलण्‍याची शक्ती मिळो, ही ईश्‍‍वरचरणी प्रार्थना.
सदानंद शेट तानावडे, राज्‍यसभा खासदार
लवू मामलेदार यांचे आकस्मिक जाणे धक्कादायक आहे. आम्ही चांगले मित्र होतो. प्रेमळ, खुमासदार, उमद्या स्वभावाचा हा माजी पोलिस अधिकारी आज आमच्‍यात नाही हेच मनाला पटत नाही. त्यांच्या मृत्यूची कर्नाटक सरकारने कसून चौकशी करावी आणि त्यास जबाबदार असलेल्यांना कडक शासन करावे.
प्रा. सुभाष वेलिंगकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT