Goa: Chess in School Dainik Gomantak
गोवा

Goa: शाळांमध्ये 'चेस इन स्कूल" उपक्रम सुरु केला

गोव्याच्या (Goa) शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यासाठी खास उपक्रम

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यासाठी फिडेने (जागतिक बुद्धिबळ महासंघ) 'चेस इन स्कूल" हा उपक्रम सुरु केला असुन  अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानेही त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महासंघाने एक समिती नियुक्त केली असुन गोवा बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आशेष केणी यांचा या समितीत समावेश केला आहे. (Launched Chess in School initiative in schools in Goa)

भारताबरोबरच इतर अनेक देशांनीही हा उपक्रम स्विकृत केला असुन त्याची कार्यवाही केव्हाची सुरु झाली आहे. या उपक्रमा अंतर्गत भारताचे ग्रॅण्डमास्टर प्रविण थिप्से तसेच इतर काही ग्रॅण्डमास्टर्स व इंटरनॅशनल मास्टर्सनी नियमावलीची एक पुस्तिका तयार केली असुन शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण देणाऱ्यांसाठीच्या प्रशिक्षकांना गेल्या सहा महिन्यात प्रशिक्षित करण्यात आल्याचे केणी यांनी सांगितले.  

शाळांमध्ये जो हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे तो केवळ बुद्धिबळ पुरता मर्यादीत नसुन त्यामुळे विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता वाढते असे दिसुन आले आहे. हा उपक्रम प्राथमिक शाळांपासुन सुरु केला जाईल त्यामुळे विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी, स्मरणशक्ती, तर्कशुद्धपणा वाढतो असे दिसुन आल्यानेच या उपक्रमाला प्राधान्य देण्यात आल्याचे केणी यांनी सांगितले.

या उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांशी संपर्क साधण्यात येईल. सरकारकडुनही मान्यता मिळवण्यात येईल असेही केणी म्हणाले. अखिल भारत बुद्धिबळ महासंघाची या पुर्विच्या कार्यकारी समित्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. पण सद्याचे अध्यक्ष संजय कपुर व सेक्रेटरी जनरल भरत सिंग चौहान यांनी या उपक्रमाला चालना देताना या उपक्रमाला लागणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT