Goa Monsoon Update: 10 जुलै पासून राज्यात मॉन्सून जोर धरणार

गतवर्षी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 8 जुलैलाच मॉन्सूनने (Monsoon) जोर धरला होता. याहीवर्षी तोच मुहूर्त साधला जाण्याची शक्यता दिसत आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

पणजी: बुधवारी दिवसभर पावसाने राज्यात दडी मारली. अचानक उष्मा वाढला असून राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र गुरुवारपासून राज्यात मान्सून नव्या जोमाने सक्रिय होण्याची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली होेती. सध्या दक्षिण गोवा भागात पावसाने हजेरी लावली आहे. (Goa Monsoon Update: Rainfall activity over Goa is very likely to increase from 10th July)

मागील आठवड्यात राज्यात पावसाचा जोर होता. पण सोमवारपासून पाऊस ओसरला. बुधवारी राज्यात कुठेच पावसाने हजेरी लावली नाही. उलट राज्यातील तापमानात अचानक वाढ झाली आहे. गेले चार दिवस राज्यातील तापमान 27 अंश सेल्सिअस होते. मंगळवारी 28 अंश सेल्सिअस होते, तर बुधवारी ते अचानक 32.3 अंश सेल्सिअस झाले. सरासरीच्या तुलनेत 2.6 अंश सेल्सिअसची वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

Goa Monsoon Update
GOA CZMP HEARING: नागरिकांची सुनावणी रद्द करण्याची मागणी
Goa Monsoon Update
GOA- बेळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद

आजपासून राज्यात मॉन्सून अधिक तीव्रतेने सक्रिय होणार आहे. तसेच वाऱ्याचा वेगदेखील वाढणार असल्याचे हवामान वेधशाळेने म्हटले होते. सध्यातरी दक्षिण गोव्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गतवर्षी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 8 जुलैलाच मॉन्सूनने जोर धरला होता. याहीवर्षी तोच मुहूर्त साधला जाण्याची शक्यता दिसत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 10 जुलैपासून गोव्यातील पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे. (Goa Monsoon Update: Rainfall activity over Goa is very likely to increase from 10th July)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com