E Marketing: गावातील पंचायत ही केवळ पायाभूत सुविधा उभारणारे माध्यम नसून पंचायतीने मानव संशाधन निर्मिती करणारे माध्यम बनावे. सध्या राज्य सरकारकडून विविध कौशल्य विकास उपक्रम राबविले जातात.
गणेशचतुर्थीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-मार्केटची सुरवात आजपासून होत आहे. जेणेकरून महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ व उत्पादने मोबाईल अॅपच्या माध्यमातून घर बसल्या मागवता येतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
या स्वयंपूर्ण ई-मार्केटची संकल्पना फक्त चतुर्थीपूर्ताच मर्यादित राहणार नाही. महिला बचतगट व इतर उत्पादने अॅपद्वारे पोहोचवण्याची संकल्पना साकारून महिलावर्गास प्रोत्सहन देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेईश-मागूश पंचायतीच्या नवीन तीन मजली पंचायतघराचे आज सकाळी उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंत्री गोविंद गावडे, आमदार केदार नाईक, माजी आमदार जयेश साळगावकर, झेडपी संदीप बांदोडकर, सरपंच सुश्मिता पेडणेकर, पंच सुहास पेडणेकर व इतर पदाधिकारी हजर होते. आठ महिन्यांत ही नवीन पंचायत वास्तू उभी करण्यात आली.
जनकल्याणासाठी सरकारचे नेहमीच पाठबळ व सहकार्य मिळाले असून या पंचायत घरासाठी जनतेने दाखवलेल्या संयम व सहकार्याबद्दल आमदार केदार नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. मंत्री गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा सन्मान
या कार्यक्रमात डॉ. विनोद साळकर, प्रा. सिल्वानो सिल्वा डायस, ऍलन डिसा, उपअधीक्षक तुषार वेर्णेकर, अधिकारी बॉस्को फेर्राव, आग्नेलो फर्नांडिस, विष्णूदास आर्लेकर, वेरे गणेशोत्सव मंडळ, गौरश साळगावकर व इतरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना शाळ, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
ई-मार्केटचा विस्तार गोव्याबाहेरही होणार: मुख्यमंत्री
या ई-मार्केटचा विस्तार सुरवातीस गोव्यात व कालांतराने राज्याबाहेर नेण्याचा विचार असल्याचे सांगत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, प्रत्येक पंच सदस्यांमध्ये इच्छाशक्ती व विकासकामे करण्यासाठी तळमळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या पंचायतीतील लोकांचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम व प्रशिक्षण राबवून नाविन्यपूर्ण कौशल्य विकास कार्यशाळा राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.