Gomantak YIN: गोमन्तक यीनतर्फे आज ‘घुमट गंध’

Gomantak YIN: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा ‘घुमट गंध’ (घुमट आरती) स्पर्धेचे आयोजन उद्या शुक्रवार दि. 15सप्टेंबर रोजी करण्‍यात आले आहे.
Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak Yin
Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak YinDainik Gomantak

Gomantak YIN: गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि श्रीनिवास सिनॉय धेंपो वाणिज्य-अर्थशास्त्र महाविद्यालय (कुजिरा-गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा ‘घुमट गंध’ (घुमट आरती) स्पर्धेचे आयोजन उद्या शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी करण्‍यात आले आहे. ही स्पर्धा धेंपो महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९.३० वाजता सुरू होईल.

Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak Yin
Vishwajeet Rane: चांगल्या आरोग्य सेवेसाठीच खासगी वैद्यकीय महाविद्यालय

या स्पर्धेचे उद्‌घाटन ‘गो‍मन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्‍य व्‍यवस्‍थापक (प्रशासन व्‍यवसाय) सचिन पोवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, प्रा. आनंद पानवेलकर व अन्‍य मान्यवर उपस्थित असतील. स्पर्धक तसेच नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यातआले आहे.

‘गोमन्‍तक टीव्ही’वर होणार सादरीकरण : पारंपरिक आरती म्हणण्याची कला युवापिढीत रुजावी तसेच हौशी युवा कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम तीन विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके आणि चषक देण्यात येईल. तर, सहभागी सर्व पथकांना प्रशस्तिपत्रके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांचे सादरीकरण ‘गोमन्‍तक टीव्ही’वर प्रसारित करण्यात येईल. तसेच या विजेत्यांना गोमन्तक भवनातील श्री गणपतीसमोर आपले सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com