Latest Goa Rain News Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा; ठिकठिकाणी झाडांची पडझड, वीजही गुल

सोमवारी रात्री गडगडाटासह आलेल्या पावसामुळे गोव्यात कित्येक ठिकाणची वीज गुल्ल झाली होती.

दैनिक गोमन्तक

सोमवारी रात्री गडगडाटासह आलेल्या पावसामुळे गोव्यात कित्येक ठिकाणची वीज गुल झाली होती. जोराचा वादळीवारा सुटल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मडगावसह सासष्टी किनारपट्टीतील कित्येक गाव काळोखात राहिले.

शेळडे येथे मुख्य वीज केंद्रावर महाराष्ट्रातून येणारी वीज खंडित झाल्यामुळे केपेसह दक्षिण गोव्यातील कित्तेक गाव काळोखात होते. (Latest Goa Rain News Updates)

त्याचबरोबर डिचोली शहरासह अनेक ठिकाणीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे डिचोली शहरासह अनेक भागात दाणादाण उडाली. साधारण पाऊण तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे रस्त्यावर पाणी झाले. रात्री साडेदहा वाजेपर्यंत डिचोली अग्निशामक दलात झाडाची फांदी कोसळल्याच्या एकाच कॉलची नोंद झाली असली, तरी पाऊस आणि वाऱ्याचा वेग पाहता काही ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे. वाऱ्यामुळे बहूतेक भागात वीज पुरवठाही खंडित झाल्याने रात्री उशीरापर्यंत सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT