Sea turtles in Goa Dainik Gomantak
गोवा

किनाऱ्यावर सागरी कासवांचे उशिराने आगमन

मोरजी किनारी भागात 1997 पासून कासवसंवर्धन मोहीम राबवली जाते.

दैनिक गोमन्तक

मोरजी: अलीकडे वातावरणात प्रचंड बदल झालेला आहे. त्‍यामुळे समुद्रकिनारी सागरी कासवांचे आगमनही उशिराने झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात येणारी कासवे थेट डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून येऊ लागली आहेत. अशाच प्रकारे तेंबवाडा-मोरजी किनारी 23 डिसेंबर रोजी आलेले एक कासव (Tortoise) 136 अंडी घालून माघारी फिरले आहे. त्या अंड्यांना वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा देण्यासाठी संरक्षण केलेले आहे. (Sea Turtles in Goa)

मोरजी (Morjim) किनारी भागात 1997 पासून कासवसंवर्धन मोहीम राबवली जाते. 2002 साली या किनाऱ्यावर 500 चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे. आतापर्यंत तेथे 248 कासावांनी अंडी घातली. त्यातील 16,735 एवढी पिल्ले समुद्रात सोडण्यास वन खाते यशस्वी ठरले आहे. 2000 साली सर्वाधिक 31 कासवे किनारी आली होती.

कासव संवर्धन मोहिमेमुळे अनेक देशांतील पर्यटक या किनारी भागात दरवर्षी येतात. मात्र या मोहिमेमुळे किनारी भागातील शॅक्स व्यवसायावर विपरित परिणाम झाल्यामुळे त्‍यांच्‍यात नाराजी आहे. कासव जगावे की मनुष्य, अशी स्थिती मोरजी किनारी भागात झाल्यामुळे अजूनही पर्यटन (Tourism) हंगामातील शॅक वितरीस करण्यास विलंब होत आहे. उलट कासवसंवर्धन मोहिमेमुळे मोरजीत मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव मिळत आहे.

बदलत्या प्रवाहानुसार कासवसंवर्धन मोहिमेचे महत्‍व पर्यटकांना पटवून दिले तर अनेकजण या मोहिमेचा अभ्यास करण्यास येऊ शकतात. त्या दृष्‍टीने आता स्थानिक व्यावसायिकांनी प्रयत्‍न करायला हवेत. मोहिमेला विरोध करण्यापेक्षा आपला व्यवसाय आणि त्यात बदल करण्याची मानसिकता ठेवावी.

दरम्‍यान, तेंबवाडा-मोरजी किनारी भागात मागच्या वीस वर्षांपासून यशस्वीरीत्या कासवसंवर्धन मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे दुर्मीळ सागरी कासव जातींना संरक्षण मिळाले आहे. या सागरी कासवांमुळे आणि संवर्धन मोहिमेमुळे मोरजीचे नाव आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर पोचले आहे, हे विशेष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT