Mumbai Children Hostage:
Mumbai Children KidnapDainik Gomantak

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Mumbai Children Hostage: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली. पवई येथे गुरुवारी (30 ऑक्टोबर) तब्बल 17 मुलांना ओलिस ठेवण्यात आले.
Published on

Mumbai Children Hostage: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली. पवई येथे गुरुवारी (30 ऑक्टोबर) तब्बल 17 मुलांना ओलिस ठेवण्यात आले. या सर्व मुलांना येथील आरए स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले होते, जिथे ही मुले एका ऑडिशनसाठी पोहोचली होती. मात्र माहिती मिळताच पोलिसांनी तडक घटनास्थळी पोहोचून या सगळ्या मुलांची सुटका केली. एवढचं नाहीतर संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन पवई पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

ऑडिशनसाठी बोलवून ओलिस ठेवले

दरम्यान, पवई येथील आरए स्टुडिओमध्ये मागील चार-पाच दिवसांपासून ऑडिशन सुरु होते. यासाठी तब्बल 100 मुले ऑडिशनसाठी या ठिकाणी पोहोचली होती. रोहित आर्य नावाच्या संबंधित व्यक्तीने काही मुलांना घरी पाठवले, परंतु 17 मुलांना स्टुडिओमधील एका खोलीतच डांबून ठेवले. ही मुले सुटकेसाठी खिडकीतून बाहेर डोकवायची. मात्र स्टुडिओला टाळ ठोकल्याचे कळताच एकच हल्लकल्लोळ उडाला.

Mumbai Children Hostage:
Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

त्याने आत्महत्तेचा प्रयत्न केला

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस चौकशीदरम्यान रोहितने अनेक धक्कादायक खुलासे केले. विशेष म्हणजे, तो आज आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याने संबंधित मुलांना ओलिस ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी रोहित आर्यशी बोलणी देखील केली.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने स्टुडिओमध्ये डांबून ठेवलेल्या मुलांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली नाही. त्याच्याशी बोलणी सुरु असतानाचा त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुलांना कोणत्या कारणासाठी डांबून ठेवण्यात आले याविषयी देखील त्याला चौकशीदरम्यान विचारण्यात आले. याचदरम्यान पोलिसांना रोहित मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समजले.

Mumbai Children Hostage:
Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

स्थानिकांनी काय सांगितले?

पवईतील स्थानिकांनी सांगितले की, मुलांना ऑडिशन्सच्या बहाण्याने बोलवण्यात आले. मागील 10 दिवसांपासून या ठिकाणी ऑडिशन्स सुरु होते. रोज दुपारच्या वेळी ऑडिशनदरम्यान मुले जेवणासाठी बाहेर जात. मात्र आज मुले बाहेर आली नसल्याचे चिंता वाढली. संबंधित आरोपीने एका स्टुडिओला प्रसिद्धी मिळवून दिली. ज्यामध्ये मुलांना ओलिस ठेवण्यात आले. रोहितकडे एअरगन देखील होती. ही एअरगन त्याने मुलांना धमकावण्यासाठी वापरली. मात्र अखेर पोलिसांनी शर्थीने स्टुडिओमध्ये प्रवेश करुन या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला अटक करुन मुलांची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com