

Mud Splash Viral Video: सोशल मीडियावर दररोज कधी अतरंगी तर कधी जुगाडू व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होतात. मात्र सध्या सोशल मीडियावर अशा एका व्हिडिओने लक्ष वेधले, ज्यामध्ये तरुणीने कारचालकास जशाच तसे उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, लोक हसून हसून लोटपोट झाले आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन एक कार वेगाने जात असल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलातून (Mud) गाडी वेगाने चालवल्यामुळे बाजूने चाललेल्या एका तरुणीच्या अंगावर तो चिखल उडतो. यामुळे ती तरुणी संतापते आणि त्वेषाने एक मोठा दगड उचलते. पण तोपर्यंत तो कारचालक पुढे निघून गेलेला असतो. यानंतर ती तरुणी त्याच ठिकाणी थांबून त्या कारचालकाची वाट पाहते. थोड्या वेळाने तोच कारचालक परत येतो, तेव्हा ती तरुणी त्याला दगड दाखवून थांबवते. ती त्याला कारमधून बाहेर काढते आणि एका बाजूला बसवते.
कारचालकाला बाजूला बसवल्यानंतर ती तरुणी स्वतः गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसते. ती गाडी चिखलातून त्याच वेगाने चालवते आणि नेमका त्याच कारचालकाच्या अंगावर चिखल उडवते. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना तो बदला घेण्याचा योग्य मार्ग असल्याचे वाटत आहे. हा व्हिडिओ 'एक्स' वर प्लॅटफॉर्मवर '@bhavisha333' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. "बदला घ्यायचा तर असा, वाह दीदी वाह! दिल खुश कर दिया," असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. बातमी लिहेपर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
दुसरीकडे, या व्हिडिओवर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने "भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला," असे म्हटले. तर दुसऱ्या युजरने "दीदीने असा धडा शिकवला की, या भावाला आयुष्यभर आठवण राहील की चिखलातून गाडी कशी चालवायची," अशी कमेंट केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.