Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Margao Court verdict: गोव्यातील गाजलेल्या वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणाचा तब्बल 13 वर्षांनंतर निकाल लागला असून, या प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 Margao Court verdict
Court Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील गाजलेल्या वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणाचा तब्बल 13 वर्षांनंतर निकाल लागला असून, या प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी सुनीता गावणेकर यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

नेमके काय घडले होते?

दरम्यान, ही घटना 25 फेब्रुवारी 2012 रोजी गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीच्या वेळी वेळ्ळी (Vellim) येथील सेंट झेवियर चर्चमध्ये घडली होती. त्यावेळी मडगाव सीआयडी विभागाचे तत्कालीन निरीक्षक कपिल नायक हे आपल्या सहकाऱ्यांसह एका निवडणूक संबंधित चौकशीसाठी चर्चमध्ये गेले होते. मात्र, 'भरारी पथकाने चर्चवर छापा टाकला' अशी अफवा परिसरात वेगाने पसरली, ज्यामुळे जमाव (Crowd) अचानक खवळला. या संतप्त जमावाने कपिल नायक यांच्यासह हवालदार कृष्णानंद राणे आणि पोलीस शिपाई कुलदीप देसाई यांना चर्चमध्ये कोंडून ठेवले आणि मारहाण केली होती.

 Margao Court verdict
Vellim: वेळ्ळी पंचायत घराजवळ ‘एमआरएफ’ उभारण्यास स्थानिकांचा विरोध

प्रकरणातील प्रमुख आरोपी

या 22 संशयित आरोपींमध्ये फादर रोमानो गोन्सालवीस आणि असोळणे चर्चचे फादर लुसियो डायस यांचाही समावेश होता. सुरुवातीला कुंकळ्ळी पोलिसांनी संशयितांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt to Murder) गुन्हा नोंद केला होता, परंतु नंतर हा गंभीर आरोप मागे घेण्यात आला आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) अन्य कलमांखाली या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवण्यात आली. तब्बल 13 वर्षे न्यायालयात (Court) सुनावणी चालल्यानंतर, न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी सर्व 22 संशयितांना निर्दोष मुक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com