Latambarse Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Latambarcem: बेकायदेशीर भूखंड, मोकाट गुरे प्रश्नांवरुन ग्रामसभा तापली; लाटंबार्सेत स्थानिक आक्रमक

Latambarcem Panchayat: पंचायत क्षेत्रातील बेकायदा भूखंड विषयावरून काल झालेली कासारपाल-लाटंबार्सेची ग्रामसभा काहीशी तापली. वरचावाडा-नानोडा भागातील भूखंड विषय ग्रामसभेत ऐरणीवर आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Latambarcem Panchayat Gramsabha

डिचोली: पंचायत क्षेत्रातील बेकायदा भूखंड विषयावरून काल झालेली कासारपाल-लाटंबार्सेची ग्रामसभा काहीशी तापली. वरचावाडा-नानोडा भागातील भूखंड विषय ग्रामसभेत ऐरणीवर आला. बेकायदेशीरपणे जमीन रूपांतरित करून भूखंड केल्याचा आरोप लोकांनी ग्रामसभेत करून या बेकायदा प्रकाराबद्दल पंचायत गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला. या भूखंडांना ग्रामस्थांनी विरोध करून विरोधात ठराव घेतला.

या प्रकरणाची चौकशी करून नगरनियोजन खाते आणि अन्य संबंधित सरकारी यंत्रणांना ठराव पाठवावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

कासारपाल - लाटंबार्से पंचायतीची ग्रामसभा सरपंच डॉ. रामा गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालय सभागृहात पार पडली.

सरपंच डॉ. गावकर यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव रामदास वळवईकर यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. या ग्रामसभेला ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच सर्व पंच सदस्यही उपस्थित होते.

मोकाट गुरांचा बंदोबस्त करा

पंचायत क्षेत्रात मोकाट गुरांची समस्या वाढली असून पंचायतीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या ग्रामसभेत गटार आदी समस्या तसेच अन्य काही मुद्दे उपस्थित झाले. कचरा कर आणि घरपट्टी आकारणीसंदर्भात तसेच अन्य काही विषयांवर ग्रामसभेत चर्चा झाली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरपंच डॉ. गावकर यांनी उत्तरे दिली. मात्र, काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT