Cash For Job: दीड कोटी लुबाडणाऱ्या श्रुती प्रभुगावकरला बड्या; BJP आणि बड्या मंत्र्याच्या 'पीए'सोबत कनेक्शन उघड

Shruti Prabhugaonkar Arrest: दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केली
Shruti Prabhugaonkar Arrest:  दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केली
Shruti Prabhugaonkar ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

Shruti Prabhugaonkar Arrested

फोंडा: गोव्यात सध्या सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेत कित्येकांना लुबाडण्याचे विविध प्रकार घडतायत आणि यामध्ये अनेक संशयितांना पोलीस दिवसेंदिवस शोधून काढत कोठडी सुनावत आहेत. नोकरीच्या आमिषाने तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. श्रुती प्रभुगावकर हिला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तिच्या नावे लुकआउट नोटीस देखील जारी केली होती.

Shruti Prabhugaonkar Arrest:  दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केली
India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

श्रुतीचे राजकीय कनेक्शन आहे का?

कॅश फॉर स्कॅम प्रकरणात अटक झालेल्या श्रुती प्रभुगावकर हिचे भारतीय जनता पक्षासोबत कनेक्शन आढळून आले आहे. श्रुती प्रभुगावकर ही गोव्यातील भाजपच्या युवा मोर्चाची माजी पदाधिकारी असून तिचे एका बड्या मंत्र्याच्या 'पीए'सोबत कनेक्शन असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com