Suleman Khan Case Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Case: भू माफिया सुलेमान खानला हायकोर्टाचा दणका! प्रकरण CBI कडे सोपवण्यास नकार; गोवा पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

Mumbai HC Dismisses CBI Plea in Land Mafia Case: जमीन हडपप्रकरणी अटक केलेल्या भू माफिया संशयित सिद्दीक्की ऊर्फ सुलेमान खान याच्याविरुद्ध क्राईम ब्रँच पोलिस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमीन हडपप्रकरणी अटक केलेल्या भू माफिया संशयित सिद्दीक्की ऊर्फ सुलेमान खान याच्याविरुद्ध क्राईम ब्रँच पोलिस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तसेच निःपक्षपातीपणे होण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना देण्यासंदर्भात त्याने केलेला फौजदारी अर्ज खंडपीठाने आज फेटाळला.

जुने गोवे पोलिसांनी संशयित सुलेमान खान याच्याविरुद्ध कोठडीतून पलायन केल्याचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये आरोपपत्रही पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रामध्ये असलेले बहुतेक साक्षीदार हे पोलिस आहेत. त्याला कोठडीतून बाहेर काढून कर्नाटक (Karnataka) येथे एका प्रकरणाचा पंचनामा करायचा असल्याचे सांगून मोटारसायकलने एका पोलिस हवालदाराने नेले.

यामागे क्राईम ब्रँच पोलिसांचे कटकारस्थान आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झालेला नाही. आरोपपत्र दाखल झाले तरी तपासकाम स्वतंत्र तपास यंत्रणेकडे देता येतो यासंदर्भातचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला आहे. त्याच्याविरुद्ध ७ प्रकरणे पोलिसांत नोंद असली तरी ती सर्व जमीन हडप प्रकरणाची आहेत.

या पलायनाच्या कटकारस्थानमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निःपक्षपाती होण्यासाठी सीबीआयकडे देण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिस अधिक्षक अक्षत कौशल व जुने गोवे पोलिस (Goa Police) निरीक्षक सतीश पडवळकर यांना द्यावेत अशी विनंती करण्यात आली. दरम्यान, सरकारी वकिलांनी संशयित सुलेमान खान याच्या अर्जाला आक्षेप घेतला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने पोलिस हवालदाराला आमिष दाखवून कोठडीतून पलायन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT