Goa Land scam Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: 12 कोटींची मालमत्ता जप्त

Land Grabbing Case: राज्यातील बेकायदा भू बळकाव प्रकरण आता केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत पोचले आहे.

दैनिक गोमन्तक

Land Grabbing Case: राज्यातील बेकायदा भू बळकाव प्रकरण आता केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत पोचले आहे. याप्रकरणी न्या. व्ही. के. जाधव यांच्या एकसदस्यीय आयोगाने अहवाल दिल्याच्या आठवडाभरातच केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याप्रकरणी 11.82 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. संचालनालयाने पत्रकातून ही माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावकारी प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई कऱण्यात आली आहे. स्टीवन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

बेकायदा संचालनालयाने केलेल्या चौकशीत मालक मृत झालेल्या, वारस विदेशात असलेल्या, तसेच वारस नसलेल्या मालमत्ता हे संशयित हेरत आणि त्या बळकावत, असे आढळून आले आहे.

बोगसगिरी आणि तोतयेगिरीच्या माध्यमातून त्यांनी या मालमत्ता बळकावल्या आहेत. मूळ मालक असल्याची बतावणी करत किंवा त्यांचे कुलमुखत्यारपत्र आपल्या नावे असल्याचे भासवून जमीन हडप केली होती.

‘ईडी’ने बनावट कॉल सेंटर प्रकरणात कुणाल गुप्ता आणि कुटुंबीयांच्या कंपन्यांच्या मालकीची 67.23 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात गोव्यातील एका रिसॉर्टचाही समावेश आहे.

मुंजाल यांच्या संपत्तीवर ‘ईडी’ची टाच

हिरो मोटोकॉर्प कंपनीचे मालक पवन मुंजाल यांची 24.95 कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. हवाला प्रकरणात ही संपत्ती जप्त करण्यात आली असल्याची माहिती ‘ईडी’कडून शुक्रवारी देण्यात आली.

दिल्लीस्थित तीन अचल संपत्तीचा जप्त संपत्तीमध्ये समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात मुंजाल यांच्या ठिकाणांवर ‘ईडी’ने छापेमारी केली होती. महसूल गुप्तचर विभागाकडून दाखल झालेल्या गुन्ह्याची दखल घेत ही छापेमारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT