land scam in goa Dainik Gomantak
गोवा

Goa: जमीन हडपप्रकरणी सरकारी अधिकाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास सुरवात; फोंड्यातील तिघांना अटक

राज्यातील जमीन हडपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) संबंधित सरकारी अधिकाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास सुरवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: राज्यातील जमीन हडपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) संबंधित सरकारी अधिकाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. पुराभिलेख खात्यातील फोंडा येथील महेश नाईक व धीरेश नाईक यांच्यासह व्यावसायिक अनिल नाईक याला काल अटक झाली.

धिरेश याला यापूर्वी अटक झाली होती. आतापर्यंत बनावट दस्तावेज तयार करून देणाऱ्या काही सरकारी नोटरींही पोलिसांच्या रडारवर आहेत.

पुराभिलेख खात्यातील जमीन नोंदणीसंदर्भातचे दाखल्यांची पुस्तिका संशयित धिरेश व महेश हे अनिल नाईक याला नेऊन देत होते. त्यातील अनेक दाखले पुस्तिकेतून गायब झालेले होते. त्यामध्ये या त्रिकुटांचा हात असल्याचे केलेल्या चौकशीत उघड झाले होते.

कार्यालयात त्यांची जमीन हडपण्यात आल्याची तक्रार दिली होती. तक्रारीत 19 जुलै 2022 पर्वी संशयित अंतोनिटा फर्नांडिस, सँड्रिक फर्नांडिस, मारिया फर्नांडिस, रावजी पाटील व सुनील गोयल तसेच बार्देश मामलेदार या सहाजणानी संगनमत करून व बोगस दस्तावेज तयार कळंगुट येथील सर्वे क्रमांक 26/9 व 476/2 मधील जमीन हडप केल्याचा दावा केला होता.

हा प्रकार मामलेदार कार्यालयात आपल्या जमिनीची चौकशी केली असता निदर्शनास आले. याप्रकरणी एसआयटीने फसवणुकीचा व कटकारस्थानचा गुन्हा दाखल केला होता.

या जमीन हडप प्रकरणामध्ये महम्मद सुहैल या मास्टरमाईंड असून आतापर्यंत त्याला पाच गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे. जामिनावर असलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी न्यायालयात माफीचा साक्षीदारसाठी अर्ज केला आहे.

दोन नवीन महसूल भवन

पेडणे आणि मडगाव येथे नवीन महसूल भवन उभारण्यात येत असून अभिलेख कार्यालयातील दस्तावेज सांभाळून ठेवण्यासाठी मडगाव आणि पेडणेत स्ट्रॉँग रूम उभारण्याचा प्रस्ताव असून तिथे ती सर्व कागदपत्रेही हलविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

यापुढे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास संबधित मामलेदाराला निलंबित केले जाईल, असा इशारा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला.

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय जमिनीवर तलाठ्यांनी लक्ष ठेवावे. आणि तलाठ्यांचा अहवाल मामलेदारांनी मागवून घ्यावा. यातूनही अतिक्रमण झाल्याचे आढळल्यास मामलेदारांनाही निलंबित केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT