Colvale Jail: कोलवाळ तुरुंगातून तब्बल 45 मोबाईल्स अन् ड्रग्ज जप्त

कैद्यांच्या खोल्यांत तुरुंग अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात 45 मोबाईल्स, चार्जर आणि ड्रग्ज सापडले आहे.
Central Colvale Jail Goa
Central Colvale Jail Goa Dainik Gomantak

Colvale Jail: कोलवाळ कारागृह विविध कारणांनी नेहमीच चर्चेच राहत आहे. हाणामारीचे प्रकार, मोबाईल व ड्रग्ज पुरवठा तुरुंग सुरक्षाव्यवस्था भेदून आत जात असल्याचे समोर आले आहे. येथील कैद्यांच्या खोल्यांत काल आकस्मिकपणे तुरुंग अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात 45 मोबाईल्स, चार्जर आणि ड्रग्ज सापडले आहे.

यामुळे सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असून हे कारागृह आहे की कॉलसेंटर? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

कारागृहात प्रवेश करणाऱ्या कैदी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत असली तरी या ठिकाणी बॅगेज स्कॅनर नाही. बॅगेज स्कॅनरसाठीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. कारागृहात धान्य व कडधान्यातून हे मोबाईल आत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरुंग कर्मचारी व कैद्यांचे नेटवर्क असल्याने ते आतपर्यंत पोहोचत आहेत.

कारागृहातील आतील जागा मोठी आहे. त्यामुळे या कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरूनहीपान त्रीच्यावेळी मोबाईल आतमध्ये बॉक्समध्ये गुंडाळून फेकले जाण्याची शक्यता आहे, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. ज्या 5 कैद्यांकडे मोबाईल्स सापडले आहेत, त्यांची चौकशी होणार आहे. यापूर्वी अनेकदा असे प्रकार उघडकीस आले आहेत.

यापूर्वीही अनेकदा कारागृहातून ड्रग्ज, मोबाईल्स, मद्याच्या बाटल्या, सिगारेट्सही सापडले आहेत. कारागृहाच्या प्रमुखपदी सरकारी अधिकाऱ्याची वर्णी लावण्याऐवजी यावेळी सरकारने पोलिस खात्याचे आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांची तुरुंग महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. कैद्यांच्या खोल्यामध्ये झडती घेण्याचे निर्देश तुरुंग जेलरना दिले होते.

जर त्यात गलथानपणा झाल्याचे दिसून आल्यास अधिकाऱ्यांना फैलावर घेतले जाईल, असा त्यांनी इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकर कारागृहात आणण्यात आला, तेव्हा त्यामध्ये दारूची बाटली सापडली होती.

ही कारवाई पुढील काही दिवस अशीच अचानक सुरूच राहणार आहे. जप्त केलेल्या मोबाईल संचमध्ये सिम कार्ड नसले तरी त्या संचाच्या आयएमईआय क्रमांकाच्या मदतीने त्यातून कोणत्या सिम कार्डने मोबाईल फोन करण्यात आला आहे, त्याचा शोध घेण्यात येणार आहे. - बॉस्को जॉर्ज, तुरुंग महानिरीक्षक

Central Colvale Jail Goa
Manohar Airport: दाबोळीच्या तुलनेत ‘मोपा’चे तिकीट महाग
  • काल सकाळी तुरुंगरक्षक, अधिकारी ड्युटीवर आल्यावर काम सुरू करण्यापूर्वी तुरुंग महानिरीक्षकांनी खोल्यांची प्रामाणिकपणे तपासणी करावी, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील अशी तंबी दिली.

  • त्यामुळे कारागृहाच्या ब्लॉक क्रमांक 3 मधून अचानकपणे कैद्यांना बाहेर काढण्यात आले. तपासणीत मोबाईल्स व ड्रग्ज कैद्यांच्या अंथरूणात तसेच शौचालयात लपवल्याचे दिसून आले.

  • तुरुंगरक्षकांना कैद्यांचे काही खाचखळगे माहीत असल्याने ड्रग्जच्या लहानसहान पुड्या तसेच मोबाईल संच सापडले. काही मोबाईल्समध्ये सिमकार्ड नव्हते. याप्रकरणाची कारागृह खात्याअंतर्गत चौकशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com