Goa Land Grabbing Case | Suleman Khan Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: सुलेमान आणि त्याची पत्नी सारिका खानला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Land Grabbing Case: सारिकाला म्हापसा येथील जमीन हडप प्रकरणामध्ये विशेष तपास पथकाने अटक केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमीन हडप प्रकरणातील सराईत गुन्हेगार सुलेमान महंमद खान ऊर्फ सिद्दीकी आणि त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिका खान या दोघांचीही वेगवेगळ्या प्रकरणांत १४ दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

केरळमध्ये सिद्दीकी याला अटक केली, तेव्हा तिलाही अटक करून गोव्यात आणले होते. म्हापसा येथील जमीन हडप प्रकरणात तिचा सहभाग होता, हे चौकशीतून उघड झाले होते. त्यामुळे पोलिस तिचाही शोध घेत होते.

सारिकाला म्हापसा येथील जमीन हडप प्रकरणामध्ये विशेष तपास पथकाने अटक केली होती. तिची ४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने ती वाढवून घेण्यासाठी न्यायालयात उभे केले असताना तिला न्यायालयीन कोठडीत देण्यात आली.

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार तिचा पती सुलेमान खान याचीही सात दिवसांची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. सुलेमानने अनेक बँक खाती उघडली होती, त्यातील काही खाती सारिकाच्या नावाने होती. तिच्या खात्यावरून काही जमीन विक्रीसाठीचे व्यवहार झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT