Lairai Jatra Stampede Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra Stampede: लईराई यात्रेच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, तर जखमींना 1 लाखांची मदत; CM सावंतांची घोषणा

Goa Lairai Jatra Stampede: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवात शनिवारी (३ मे) पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरलं आहे.

Sameer Amunekar

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवात शनिवारी (३ मे) पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरलं आहे. या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मृतांच्या कुटुंबाला तसंच जखमींना मदतीची घोषणा केलीय.

शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान, त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सांगितले की, या घटनेच्या सखोल चौकशीसाठी संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या जत्रोत्सवासाठी दरवर्षी हजारो भाविक गोव्यातून तसंच महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागांतून शिरगाव येथे येतात. दरम्यान, आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक मोठी गर्दी झाली आणि गोंधळ उडाल्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.

शिरगाव येथे झालेल्या झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून, ५० जण जखमी झाले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. "उपचारात कोणतीही कमी पडणार नाही. गरज भासल्यास बाहेरून तज्ज्ञ डॉक्टरही मागवले जातील. सर्व रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT