lady grated Bail for attacking neighbor  Dainik Gomantak 
गोवा

महिलेवर हल्लाप्रकरणी माय-लेकीला जामीन

शेजारच्या भाडेकरू महिलेवर हल्ला केल्याचा दोघींवर आरोप

दैनिक गोमन्तक

म्हापसा : शेजारच्या भाडेकरू महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी संशयित माय-लेकीला अटक केली. नंतर या दोघींची जामिनावर सुटका झाली. हा प्रकार मायणा पाटो, कामुर्ली येथे घडला. दरम्यान, म्हापसा न्यायालयाने या संशयित माय-लेकीची सशर्त जामिनावर सुटका केली. प्रत्येकी 10 हजार रूपये हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार आणि गोवा सोडून न जाणे तसेच तक्रारीत हस्तक्षेप न करणे, अशा अटी घातल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सदर घटना बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. बोरीकडे मायणा पाटो कामुर्ली येथे एका घरात निसाद व कांबळी सुवारीस ही दोन कुंटूंबे भाडेकरू म्हणून शेजारी राहतात. त्यांना खोलीत जाण्यासाठी एकच वाट असून त्यावरून वारंवार खटके उडत. बुधवारी संशयित माया व जोस्लीन सुवारीस यांनी तक्रारदार मदनची पत्नी रूपाली निसाद (41) हिच्यावर सळीने वार केला. यात त्या जखमी झाल्या. हवालदार सुनिल मांद्रेकर तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

VIDEO: निरीक्षक नाईक पुन्हा कोलव्यात, ग्रामस्थ संतप्त; आमदार व्हिएगस यांनी पोलिस अधीक्षकांना विचारला जाब

ISL 2026: "..नुकसान सोसावे लागेल", चेन्नईयीनविरुद्धच्या सामन्यापूर्वी FC Goaचे प्रशिक्षक मार्केझनी दिला इशारा; गोलबाबत व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT