Ponda Crime Dainik Gomantak
गोवा

Goa News : 'लाडली लक्ष्मी' योजना; कमिशन कमी दिल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्ती युवतीची महिलेला मारहाण

फोंडा येथे घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण खात्यातर्फे 'लाडली लक्ष्मी' योजना राबवण्यात येत आहे. राज्यात 'लाडली लक्ष्मी' योजनेच्या लाभार्थी युवती, महिलांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात येत आहे.

दरम्यान, फोंडा येथे 'लाडली लक्ष्मी' योजनेतील निम्मी रक्कम एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ती युवतीने कमिशन म्हणून मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम दिली नाही म्हणून त्या युवतीने संबंधित महिलेला मारहाण केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, 'लाडली लक्ष्मी' योजनेतील मंजूर रक्कमेतील निम्मी रक्कम कमिशन म्हणून देण्याची मागणी एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती असलेल्या युवतीने महिलेकडे केली होती.

मात्र, कमिशन म्हणून महिलेने संबंधीत युवतीला कमी रक्कम दिली. याच रागातून कार्यकर्ती असलेल्या युवतीने महिलेला जबर मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फोंडा पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. राज्यातील महिला व युवतींनी 'लाडली लक्ष्मी' योजनेसाठी महिला आणि बालकल्याण खात्याकडे अर्ज पाठवले आहेत. मात्र काही अर्ज प्रलंबित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT