Panjim Smart City : 'पणजीत अजून किती दिवस सुरू राहणार काम? 'स्मार्ट सिटी'बाबत महापौर म्हणाले...

स्मार्ट सिटीच्या कामाच्या प्रगतीबाबत महापौर मोन्सेरातांनी दिली माहिती
Rohit Monserrate
Rohit MonserrateDainik Gomantak

Panjim Smart City : पणजीत स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी खोदकाम सुरु आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणची माती न काढल्याने वाहने घसरुन किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

Rohit Monserrate
Mapusa Cylinder Blast: घातपात नव्हे 'यामुळे' झाला बारमध्ये स्फोट, काय म्हणाले गोव्याचे DGP?

मोन्सेरात म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंतिम मुदत ऑक्टोबर 2023 ही आहे. मलनिस्सारणाची कामे 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पणजी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल.

"भविष्यात कोणत्याही स्मार्ट सिटीच्या कामासाठी आम्ही कंत्राटदाराला प्रकल्पाचा रोड मॅप विचारू. त्यानंतर यावर जर नागरिक समाधानी असतील तर आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करू त्यानंतरच काम पुढे सुरु करण्यात येईल असे मोन्सेरात यांनी सांगितले.

Rohit Monserrate
Goa Government Schools : बंद असलेल्या 'त्या' 68 शाळांबाबत गोवा सरकारचा मोठा निर्णय

पणजीत एकीकडे स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत तर दुसरीकडे मलनिस्सारणची कामे सुरु असल्याने ठिकठिकाणी रस्ते अडविले जात आहेत. ही कामे विविध ठिकाणी संथगतीने सुरु आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून सुरु असलेले काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

रस्त्यावर खोदकाम, पाईपलाईन घालण्याच्या कामांमुळे शहरात धुळीचे वातावरण पसरत आहे. शिवाय सतत वाहतूक कोंडी होत आहे. किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com