Kushavati Mock Drill Dainik Gomantak
गोवा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

Kushavati disaster management drill: कुशावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुदास एस. टी. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मडगावातील जिल्हा प्रशासन कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: कुशावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुदास एस. टी. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मडगावातील जिल्हा प्रशासन कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाळोळे समुद्रकिनारा, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सांगे, दूधसागर नदीवरील धावकोण पूल, धारबांदोडा आणि अमेय फ्युएल स्टेशन, केपे येथे हे सराव आयोजित करण्यात येणार आहेत. बैठकीला ‘एनडीआरएफ’चे अधिकारी, विविध संबंधित विभाग व संस्थांचे अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, मामलेदार, मुख्याधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

या मॉक ड्रिलचा उद्देश विविध विभागांमधील समन्वय बळकट करणे, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांची कार्यक्षमता तपासणे आणि आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संबंधित संस्थांची तयारी पडताळणे हा आहे.

आपत्ती यंत्रणा होणार अधिक सक्षम

सरावादरम्यान आपत्कालीन सेवा वेळेत उपलब्ध होणे, प्रभावी संवाद, नागरी संरक्षण, स्वयंसेवकांचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीसाठीची तयारी यावर विशेष भर दिला जाणार आहे.

सरावातून आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करणे, सहभागी संस्थांची प्रतिसादक्षमता वाढवणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे शक्य होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT