Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

Goa Housing Board e auction: गोवा गृहनिर्माण मंडळाने हरवळे–साखळी आणि माडेल–थिवी येथील १७,६२३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन मोठे भूखंड ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी काढले आहेत.
Goa Housing Board
Goa Housing BoardDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा गृहनिर्माण मंडळाने हरवळे–साखळी आणि माडेल–थिवी येथील १७,६२३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन मोठे भूखंड ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी काढले आहेत. परंतु, हे भूखंड खरेदी करण्‍यासाठी मूळ ठेव म्हणून एक ते तीन कोटी रुपये असणे गरजेचे करण्यात आले आहे.

मंडळाने जारी केलेल्‍या नोटिशीनुसार, हरवळे-साखळी येथील ३,८२८ आणि माडेल-थिवी येथील १३,७९५ चौरस मीटरच्‍या भूखंडाची ई-लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे.

त्‍यासाठी इच्छुकांना www.goaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर २५ सप्टेंबर २०२६ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

Goa Housing Board
Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

हरवळे-साखळी येथील भूखंडाचा मूळ दर २,५०० रुपये प्रति चौरस मीटर ठेवण्यात आला असून या भूखंडासाठी १०० एफआर मंजूर आहे. या लिलावात उतरण्यासाठी अर्जदाराला सुरुवातीला एक कोटी रुपयांची अनामत रक्कम मंडळाकडे जमा करावी लागणार आहे.

Goa Housing Board
Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

माडेल-थिवी येथील भूखंडाचा मूळ दर १३,५०० रुपये प्रति चौरस मीटर असून यासाठी १५० एफआर मंजूर आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी तीन कोटी रुपयांची अनामत ठेव जमा करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com