kundaim industrial estate fire Dainik Gomantak
गोवा

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Kundaim Fire News: औद्योगिक वसाहतीतील रस्त्यालगत व कारखान्यांच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत, काटेरी झुडपे व रानझाडे वाढलेली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कुंडई औद्योगिक वसाहतीत वीजतारा तुटणे, झुकलेले खांब आणि तारांवर बसणाऱ्या पक्ष्यांमुळे पडणाऱ्या ठिणग्या या कारणांमुळे परिसरातील कोरडे गवत व झुडपांना अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगींचा थेट परिणाम औद्योगिक युनिट्सवर होत असून मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

औद्योगिक वसाहतीतील रस्त्यालगत व कारखान्यांच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत, काटेरी झुडपे व रानझाडे वाढलेली आहेत. वीजतारांवर टेकलेल्या फांद्यांमुळे किंवा पक्ष्यांमुळे पडणाऱ्या ठिणग्यांमुळे या गवताला आग लागते.

ही आग वाऱ्यामुळे वेगाने पसरत असल्याने गॅस सिलिंडर, रसायने, प्लास्टिक साहित्य आणि साठवलेल्या कच्च्या मालालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता येथील उद्योजक व कामगारांनी व्यक्त केली आहे. उद्योगांना लागणारा थेट धोका लक्षात घेता सरकार व संबंधित खात्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक उद्योजकांनी केली आहे.

सुरक्षेकडील दुर्लक्ष चिंताजनक

कुंडई औद्योगिक वसाहत ही राज्याच्या अर्थचक्राला गती देणारा महत्त्वाचा औद्योगिक पट्टा आहे. अशा ठिकाणी सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असून आगीचा धोका टाळण्यासाठी वेळ न दवडता सरकारने नियोजनबद्ध पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT