Kundaim: ..तोल गेला आणि छतावरून खाली कोसळला! कुंडईतील घटना; झारखंडच्या कामगाराचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू

Kundaim Accident: सदर घटना छत दुरुस्तीचे काम सुरू असताना घडली. उंचावर काम करत असताना मुंडा तोल जाऊन खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
Goa Death News
Tragic DeathDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुंडई औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी (ता. १) दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात ३६ वर्षीय कामगार थेबू मुंडा याचा मृत्यू झाला. झारखंडचा रहिवासी असलेला थेबू मुंडा काही वर्षांपासून कुंडई भागात वास्तव्यास होता.

सदर घटना छत दुरुस्तीचे काम सुरू असताना घडली. उंचावर काम करत असताना तो तोल जाऊन खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघातानंतर त्याला तातडीने मडकई आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.

Goa Death News
Goa Accidental Deaths: ..अजून किती लोकांचे जीव जाणार? गोव्यात अपघाती बळींचे दीडशतक; 25 जुलैपासून सात जणांचे मृत्यू

तेथे डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच थेबू मुंडा याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संबंधित औद्योगिक आस्थापनात हळहळ व्यक्त केली जात आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षाकवच वापरण्यात आले होते का, याबाबत तपास सुरू आहे.

Goa Death News
Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; जिममध्ये आला हृदयविकाराचा झटका आला

फोंडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कामगार संघटनांनी या अपघाताची गंभीर दखल घेऊन कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधी कठोर नियमावली अमलात आणण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com