Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Margao News: ‘कुणबी क्राफ्ट हॅण्डलूम व्हिलेज’ लवकरच : सुभाष फळदेसाई

Subhash Phal Desai: ग्रामोद्योगासह पर्यटन क्षेत्र म्‍हणूनही सांगेचा विकास होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Phal Desai: मडगाव उगे-सांगे येथील कुणबी क्राफ्ट हॅण्डलूम व्हिलेजसाठी हस्तकला, ग्रामीण आणि लघुउद्योग विकास महामंडळातर्फे निविदा जारी करण्यात आली आहे.

सुमारे १६ हजार चौ.मी. क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी १२ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे. कंत्राटदाराने या प्रकल्पाचे काम ९ महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही निविदा चालू महिन्‍याच्‍या अखेरीस खुली होईल, अशी माहिती सांगेचे आमदार समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

हा प्रकल्‍प केवळ ग्रामोद्योगालाच चालना देणारा नसून हा भाग पर्यटनदृष्‍ट्याही विकसित हाेणार आहे. या ठिकाणी गोव्‍यातील हस्‍तकला वस्‍तूंचे कायमस्‍वरूपी एक्झिबिशन दालन सुरू केले जाणार असून हा पूर्ण ग्राम पर्यटकांना आकर्षित करणारा असेल.

त्‍यातून सांगेसारख्‍या भागात नव्‍या रोजगाराच्‍या संधीही उपलब्‍ध होतील, असे फळदेसाई यांनी सांगितले.

विशेष दालने उभारणार

राज्यातील हस्तमाग आणि हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी कुणबी व्हिलेज उभारण्यात येणार आहे. हे व्हिलेज देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

येथे कुणबी हस्तकला, कुंभारकाम तसेच बांबूपासून निर्मित उत्पादनांसाठी सहा विशेष दालने बांधण्यात येतील. या कलांच्या प्रदर्शन व कार्यशाळांसाठी तीन वेगळे ब्लॉक बांधण्यात येणार आहेत. या इमारतीत एकूण १२ खोल्या असतील, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

अशी निविदा प्रक्रिया

या प्रकल्‍पासाठी बाेली लावणाऱ्या कंत्राटदाराला २५ लाख ८८ हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. निविदा भरण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. २८ रोजी दुपारी ३.३० वा.नंतर निविदा खुली केली जाणार आहे.

हा प्रकल्प उगे येथील सर्व्हे क्रमांक २५/२ आणि २६/३ येथे उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी केंद्राकडून १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित खर्च राज्य सरकार करणार आहे. प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून डीसीपीएल कंपनीची नियुक्ती झाली आहे.

पर्यटन विकास महामंडळ आणि वनविकास महामंडळ यांना बराेबर घेऊन येथे पर्यटकांना राहण्‍यासाठी कुटिरे आणि अन्‍य सुविधा उभारण्‍यात येणार आहेत. एकाचबरोबर शंभर पर्यटक या ग्रामात राहू शकतील, अशी सोय केली जाणार आहे. या प्रकल्‍पाच्‍या जवळ असलेल्‍या साळावली धरणाचेही सौंदर्यीकरण हाती घेण्‍यात येणार आहे.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रत्येक पंचायतीत नाकाखाली कर चुकवेगिरीचा घोटाळा; वेंझीच्या प्रश्नावरुन मंत्री गुदिन्होंनी पंचायतीना दिला कडक इशारा

Goa Assembly Session: "आम्ही मतांचे राजकारण करत नाही,गोव्याच्या भल्यासाठी काम करतोय!" EHN वादावर मुख्यमंत्र्यांचे सरदेसाईंना 'सडेतोड' उत्तर

ICC Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत उलटफेर! यशस्वी जयस्वालला मोठा फटका, जो रुट पहिल्या स्थानी कायम; पंतने घेतली आघाडी!

Damodar Saptah: वास्कोत 1899 साली प्लेगची साथ आली, गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते; हतबल जनतेला तेव्हा 'श्री दामोदर' देवाने तारले

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

SCROLL FOR NEXT