Dudhsagar Waterfall Tourism Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Tourism: 'दूधसागर'ला पर्यटकांचा गोंधळ! तोबा गर्दीमुळे जीप पडल्या अपुऱ्या; संख्या वाढवण्याची मागणी

Kulem Dudhsagar Jeep Tour Operators: दिवाळीच्या सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येतात. मात्र धबधबा परिसरात घेउन जाणाऱ्या २४० जीप गाड्यांची सेवा अपुरी पडत असल्याने पर्यटकांना कुळेत येऊन दूधसागर धबधबा न पाहताच माघारी फिरावे लागते.

गोमन्तक डिजिटल टीम

Kulem Dudhsagar Jeep Tour Operators Demands

कुळे: दिवाळीच्या सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येतात. मात्र धबधबा परिसरात घेउन जाणाऱ्या २४० जीप गाड्यांची सेवा अपुरी पडत असल्याने पर्यटकांना कुळेत येऊन दूधसागर धबधबा न पाहताच माघारी फिरावे लागते. त्यामुळे जीप गाड्यांची संख्या ३०० पर्यंत वाढवण्याची मागणी कुळे दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष नीलेश वेळीप व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

वन खात्याच्या नियमानुसार २४० जीप गाड्यांना धबधबा परिसरात नेण्यास परवानगी आहे. या २४० गाड्या सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत सुटतात. त्यानंतर आलेल्या पर्यटकांना जीप गाड्या मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना नाराज होऊन माघारी फिरावे लागते. यामुळे पर्यटकांंचा वेळ तसेच पैसाही वाया जातो. सोमवारी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र २४० जीपगाड्या भरून गेल्यानंतर उर्वरीत पर्यटकांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

पर्यटकांकडून हुज्जत घालण्याचा प्रयत्न

दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची कुळे गावात रीघ लागल्याचे दिसून येते. त्यामुळे यापूर्वी थंडावलेला कुळे बाजारही गजबजला आहे. सोमवारी सकाळी २४० जीप गाड्या पर्यटकांना घेऊन गेल्यानंतर त्यानंतर आलेल्या पर्यटकांना जीप गाड्या नसल्याने धबधब्याकडे जाता आले नाही. यावेळी काही पर्यटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नीलेश वेलीप व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही पर्यटक धबधब्याकडे जाण्याचा हट्ट धरून बसल्याने शेवटी वेळीप यांनी अतिरिक्त आठ गाड्यांची सोय करून दिल्याने ते पर्यटक दूधसागर धबधब्याकडे जाऊ शकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT