Goa Crime: गोव्यात अनेक वाहनांना नंबरप्लेटच नाही! किनारी भागात सुळसुळाट; त्वरित कारवाईची मागणी

Goa News: एकच क्रमांक पट्टी असलेली वाहने वा क्रमांक पट्टी न लावता वाहने भाड्याने देणे असे प्रकार वाढले आहेत. सध्या अशा वाहनांचा किनारीभागात सुळसुळटात दिसून येतो.
Goa Traffic Department, Illegal Activity
traffic rules violationDainik Gomanatak
Published on
Updated on

Increase in Vehicles Being Rented Without Proper Registration in Coastal Regions

मोरजी: पर्यटन हंगाम सुरू झाला की किनारी भागात दुचाकी व चारचाकी वाहनांना मागणी वाढते. अनेक पर्यटक दुचाकी वा चारचाकी वाहने घेउन फिरणे पसंत करतात. अशा पर्यटकांसाठी रेंट अ बाईक वा कारची सोय उपलब्ध आहे. परंतु मागणी जास्त असल्याने व अति कमाई करण्याच्या हव्यासापोटी यात आता बेकायदा गोष्टींचाही सहभाग झाला आहे.

अनेकांनी आपली खासगी वाहने या व्यवसायात उतरवली आहेत. तसेच एकच क्रमांक पट्टी असलेली वाहने वा क्रमांक पट्टी न लावता वाहने भाड्याने देणे असे प्रकार वाढले आहेत. सध्या अशा वाहनांचा किनारीभागात सुळसुळट दिसून येतो.

यामुळे सरकारचा महसूल बुडतोच, त्याच बरोबर यामुळे बेकायदा गोष्टींनाही थारा मिळतो. जेव्हा कधी अशा वाहनांना अपघात होतो, तेव्हा वाहनचालक वाहन घेउन पळ काढतो. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. किनारी भागात अंतर्गत रस्त्यांवर अशा वाहनांचा वापर जास्त असतो. तसेच मुख्य रस्त्यांवरही वाहतूक पोलिसांची नजर चुकवून ही वाहने हाकलली जातात.

चोरीची वाहने शक्य

क्रमांक पट्टी न लावता जी वाहने हाकलली जातात, त्या वाहनांची सखोल चौकशी होणे आवश्‍यक आहे. ही वाहने चोरीची वा कोणतीही कागदपत्रे नसलेली असू शकतात. भंगारात टाकलेली वाहने दुरुस्त करूनही वापर केला जात असल्याचाही संशय आहे.

Goa Traffic Department, Illegal Activity
Goa Crime: देहव्यापाराच्या तस्करीत 30 टक्के महिला महाराष्ट्रातील! नोकरीच्या आमिषाने गोव्यात आणून फसवणूक

कारवाई आवश्‍यक

पर्यटन व्यवसाय करणारी खासगी वाहने किंवा एकच क्रमांक पट्टी असलेली वाहने वा क्रमांक पट्टी न लावता वाहने चालवणे या विरोधात वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम उघडणे आवश्‍यक आहे. अशा वाहनांमुळे अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका बसतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com