kule Accident Dainik Gomantak
गोवा

kule Accident : सुकतळी-मोले येथे ट्रकची झाडाला धडक; चालक जखमी

kule Accident : सुकतळी येथे दुपारी २.२० वा.पोहोचल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहनाने थेट रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

kule Accident :

कुळे, कर्नाटकहून वेर्णा येथे जाणाऱ्या अवजड ट्रकने सुकतळी-मोले येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली.

या धडकेत कर्नाटक येथील ट्रकचालक शंकर अलीगन (३१) याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ‘गोमेकॉ’मध्ये उपचार करून त्याला घरी पाठवले.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळी येथून वेर्णा येथे हा ट्रक जात होता. या ट्रकमध्ये रेफ्रीजरेटर होते. सुकतळी येथे दुपारी २.२० वा.पोहोचल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहनाने थेट रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली.

त्यामुळे ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असल्याने चालक केबिनमध्येच अडकला.

माहिती मिळताच कुळे पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक जवानांनी त्या ठिकाणी येऊन केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून तिस्क येथे इस्पितळात पाठविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT