EV Kadamba Ride  Dainik Gomantak
गोवा

KTC EV Rides: सवलतीच्या पासधारकांना इलेक्ट्रिक बससाठी एक्सट्रा 5 रुपये भरणं अनिवार्य!! ....

EV Rides Price Hike: इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास करायचा असल्यास अतिरिक्त 5 रुपये द्यावे लागतील

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim,Goa

Panjim: कदंब परिवहन महामंडळ (KTC)च्या आदेशानुसार सवलतीच्या पासधारकांना इलेक्ट्रिक वाहनांनी (EVs) प्रवास करायचा असल्यास अतिरिक्त 5 रुपये द्यावे लागतील. काही पासधारकांनी वाढीव रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

2012 पासून सुरू असलेली सवलतीची पास प्रणाली सामान्य प्रवाशांना 40 टक्के तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांची सवलत ऑफर करते. मात्र या सवलती वातानुकूलित ईव्हीवर लागू होत नसून डिझेल बसच्या भाड्यावर लागू होतात.

वातानूकुतील बस आलेल्या क्षणीच हे स्पष्ट होते की हा प्रवास डिझेल बसपेक्षा काहीसा महाग असेल. काही पास नसलेले प्रवासी वातानुकूलीत प्रवासासाठी आणखीन पैसे भरण्याची तयारी दाखवतात मात्र सवलतीच्या पासधारकांनी अतिरिक्त 5 रुपये भरायला नकार दिल्याने पास होल्डर्स आणि कदंबा कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.

पासधारक सामान्य भाडं देऊन वातानुकूलित ईव्हीने प्रवास करू शकत नाहीत. वातानुकूलित बसचे भाडे देणं भाग आहे आणि पासची रक्कम प्रत्येकाच्या प्रवासानुसार ठरलेली असते, म्हणूनच मासिक पास नूतनीकरणासाठी अतिरिक्त शुल्क जोडले जाईल.

काही स्पष्टीकरणासाठी पाहिजे असल्यास प्रवासी KTC मुख्य कार्यालयाशी संपर्क साधू शकतात, मात्र जर पासधारकांनी पैसे देण्यास नकार दिला तर त्यांच्या पासमध्ये अतिरिक्त रक्कम जोडली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT