Mhadei Water and CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: कर्नाटककडून पाणी वळविण्याचे काम पुन्हा सुरू, प्रमोद सावंतांना म्हादईपेक्षा खुर्चीची जास्त चिंता; युरी आलेमाव

Mhadei River Dispute News: नेरसे येथे त्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नाही, तरीही ते नियमांचे उल्लंघन करत आहेत, असे आलेमाव म्हणाले.

Pramod Yadav

Mhadei Water Dispute Kalasa-Banduri Nala project

पणजी: म्हादईच्या रक्षणासाठी कर्नाटकविरोधात लढण्यास भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत असमर्थ ठरले आहेत, त्यामुळे शेजारील राज्य पाणी वळविण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शुक्रवारी (०४ ऑक्टोबर) केली.

कर्नाटक नीरवरू निगम लिमिटेडने खानापूरमधील नेरसे गावात काम सुरू केल्याचे, या कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेवणारे नामवंत पर्यावरणवादी आणि अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या निदर्शनास आले आहे, मात्र गोवा सरकारचे या गोष्टींकडे लक्ष नाही. ते निष्क्रिय झाले आहे असे आलेमाव म्हणाले.

कनार्टकच्या प्रयत्नांवर पर्यावरणप्रेमी आणि गोमंतकियांनी चिंता व्यक्त केली आहे. पण सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कर्नाटकच्या कारवायांची पर्वा नाही, त्यांनी कर्नाटकला हवे ते करण्याची मोकळीक दिली आहे असे आलेमाव म्हणाले.

कर्नाटककडे काम सुरू करण्यासाठी कोणत्याही सक्तीच्या परवानग्या नाहीत. नेरसे येथे त्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नाही, तरीही ते नियमांचे उल्लंघन करत आहेत असे आलेमाव म्हणाले.

'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा आणि कर्नाटक यांच्यातील प्रदीर्घ वाद मिटला असून त्यांना नदी वळवण्याची परवानगी दिली आहे, असे म्हटले होते. हे आता खरे ठरले असून यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हादईच्या रक्षणासाठी काहीच करत नाहीत. म्हादईच्या रक्षणापेक्षा आपले पद वाचवण्याची त्यांना जास्त चिंता आहे,' अशी टीका आलेमाव यांनी केली.

'प्रमोद सावंत नेहमीच 'भिवपाची गरज ना' असे म्हणतात. पण आता काळजी करण्याची गरज आहे. या परिस्थितीला मंत्री सुभाष शिरोडकर हेही तितकेच जबाबदार आहेत, कारण ते अपयशी ठरले आहेत.'

'गोवा सरकार कर्नाटक विरोधात अवमान याचिका दाखल करणार का? भाजपने राजकीय फायद्यासाठी म्हादई कर्नाटकला विकली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हादईबाबत गंभीर नसून केवळ जनतेची दिशाभूल करतात, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे,' असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT