MLA Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

...म्‍हणून आंदोलन स्‍थगित: कृष्णा साळकर

मुख्‍यमंत्री करणार गोवा शिपयार्डशी चर्चा

दैनिक गोमन्तक

वास्को: येथील गोवा शिपयार्डच्या व्यवस्थापनाशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या 18 किंवा 19 तारखेला चर्चा करून नोकरीभरतीबाबत माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्‍याचा निर्णय आम्‍ही मागे घेतला आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की मुख्यमंत्री यासंदर्भात योग्य तोडगा काढतील, असा आशावाद वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी व्‍यक्त केला.

ब्रह्मस्थळ-जुन्ता वसाहतीलगतच्या नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाचा शुभारंभ केल्‍यानंतर साळकर बोलत होते. यावेळी नगरसेवक दीपक नाईक, माजी नगराध्यक्ष कुयेल्हो व इतर मान्‍यवर उपस्थित होते. साळकर म्‍हणाले की, पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुरगाव पालिकेने यापूर्वीच मान्सूनपूर्व कामांना आरंभ केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची जी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे, ती निरर्थक आहे. आम्ही विकासकामांनाही वेग दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांना कामे दिसतील.

परप्रांतीयांना मिळते नोकऱ्यांमध्‍ये झुकते माप

गोवा शिपयार्डने स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची गरज आहे. परंतु तसे होत नसल्याचे दिसून येत आहे. येथे केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या गोवा शिपयार्ड, एमपीटी अशा सात यंत्रणा आहेत. परंतु तेथे स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. यासाठी राज्य सरकारने योग्य धोरण तयार करण्याची गरज आहे असे आम्‍ही निवडणुकीपूर्वी स्पष्ट केले होते. सरकारमध्ये असल्याने यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर हा प्रश्न नेला. त्यांनी आंदोलन करू नका, असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT