डिचोलीत नाल्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू...

जलस्रोत खात्यातर्फे हे काम करण्यात येणार आहे.
While starting the work of cleaning the drain, MLA Dr. Shettye.
While starting the work of cleaning the drain, MLA Dr. Shettye.Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मॉन्सूनपूर्व कामांतर्गत डिचोलीतील शिरोडकर सभागृहाच्या मागील बाजूच्या नाल्यातील गाळ उपसण्यात येणार आहे. जलस्रोत खात्यातर्फे हे काम करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 14) डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी नगरसेवक अनिकेत चणेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण बेतकीकर, जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के. पी. नाईक, अभियंता नरेश पोकळे यांच्यासह रोहिदास पळ आदी नागरिक उपस्थित होते. शिरोडकर सभागृहाच्या मागील बाजूने गेलेल्या नाल्यातील गाळ उपसला नाही, तर पावसाळ्यात हा नाला तुंबून पाणी बाहेर फुटते. तेव्हा हा नाला लवकरात लवकर उपसा असे निर्देश आमदार डॉ. शेट्ये यांनी यावेळी संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. नाल्यातील गाळ उपसल्यानंतर पावसात नाला तुंबून समस्या निर्माण होणार नाही, असे अनिकेत चणेकर यांनी सांगून समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa journalists vs Gautam Khattar
Mhadei Wildlife Sanctuary Tiger Deaths
Sanatan Dharma Insult Demand For Arrest
Biological Mother Intervention Plea Rejected
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com