Korgaon Village meeting Dainik Gomantak
गोवा

'त्या' 22 बंगल्यांसाठीचा परवाना रद्द करा

कोरगाव ग्रामसभा ः ग्रामस्थ आक्रमक; डोंगर कापणीवरून वादंग

दैनिक गोमन्तक

पेडणे : कोरगाव पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर डोंगर कापणी, अपुरा पाणीपुरवठा, वारवांर खंडित होणारी वीज आदी समस्यांवरून कोरगाव पंचायतीची ग्रामसभा चांगलीच गाजली. तसेच माईण - कोरगाव येथे २२ बंगल्यांसाठी देण्यात आलेला परवाना ग्रामपंचायतीने रद्द करावा असा ठराव संमत करण्यात आला.

सरपंच उमा साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला व्यासपीठावर कुस्तान कुयेलो, अब्दुल नाईक, प्रमिला देसाई, स्वाती गवंडी, समिल भाटलेकर, वसंत देसाई, पालयेकर, पंचायत सचिव श्रध्दा कोरगावकर व निरीक्षक म्हणून देवेश पार्सेकर उपस्थित होते.

माईण - कोरगाव येथे मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी सुरू असून त्याप्रकरणी सविस्तर माहिती द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच त्यासंबंधी कोणते सोपस्कार झाले आहेत, डोंगर कापणी करणाऱ्यांची माहिती द्यावी, त्यांची नावे जाहीर करण्यात यावीत अशी जोरदार मागणी नरेश कोरगावकर व ग्रामस्थांनी केली. त्यावर पंचायत सचिव श्रध्दा कोरगावकर यांनी याप्रकरणी पूर्ण केलेल्या सोपस्कारांची माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी सदनिका नसताना तुम्ही येथे कशी काय परवानगी दिली? स्थानिकांना अशी परवानगी सहानभुतीपूर्वक द्यावी, पण गावाबाहेरील व्यक्तींना असे परवाने देऊ नयेत अशा सूचना करण्यात आल्या. या ठिकाणी २२ बंगल्यांसाठी देण्यात आलेला परवाना ग्रामपंचायतीने रद्द करावा अशी मागणी करून ठराव संमत करण्यात आला.

विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव

एखाद्या महिलेचा नवरा वारल्यावर त्या महिलेचा कुंकू पुसण्यात येतो, तिचे मंगळसुत्र गळ्यातून काढण्यात येते. यामुळे विधवा झालेल्या महिलेस समाजात चांगली वागणूक मिळत नाही. त्यासाठी ही प्रथा बंद व्हावी, अशी सूचना पंचायत सचिव स्वाती गवंडी यांनी मांडली आणि तसा ठराव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT