वास्को उड्डाण पुलावर मद्यपींचा वावर वाढला!

वाहतुकीला धोका : पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
Vasco Flyover
Vasco FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : गांधीनगर - वास्को ते बोगदापर्यंत पूर्ण झालेला राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरलेला असला, तरी हा उड्डाणपूल मद्यपान व अमलीपदार्थ सेवन करणाऱ्यांसाठी माहेरघर बनला आहे. या उड्डाण पुलावर दिवस-रात्र अनैतिक व्यवसायांत वाढ झाल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

वेर्णा ते मुरगाव बंदरापर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गात वास्को, गांधीनगर, बायणा, देस्तेरो, बोगदा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर हा पूल राज्यात पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. इतर राज्यातील शेकडो नागरिक हा पूल पाहण्यासाठी दररोज येत असतात. त्यामुळे वास्को बायणा समुद्र किनाऱ्यावर देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. हा समुद्रकिनारा भविष्यात पर्यटकांसाठी एक केंद्रबिंदू बनणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग उड्डाण पुलावर मद्यपींच्या संख्येत वाढ झाल्याने संपूर्ण उड्डाण पुलाच्या बाजूस दारूच्या बाटल्या नजरेस पडत आहेत. यासाठी मुरगाव पोलिसांनी आपली गस्त वाढवावी व पुलावर वाहने उभे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Vasco Flyover
फादर फिलीप नेरी फेर्रांव यांची कार्डिनलपदी नियुक्ती

वास्को - गांधीनगर ते बोगदापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण झाले, तेव्हापासून या उड्डाणपुलावर दारुड्यांनी मद्यपान करण्यास सुरवात केली आहे. मुरगाव पोलिसांतर्फे दिवस-रात्र गस्ती वाढवली तरीही तेथील मद्यपी कमी झालेले नाहीत. पोलिसांनी अनेकवेळा मद्यपान करणाऱ्या युवकांना पकडून कारवाई केली आहे. या उड्डाणपु लावर वाहने उभी करण्यास सक्त मनाई असताना देखील वाहने उभी केली जातात. तसेच सकाळ-संध्याकाळ नागरिक या उड्डाण पुलावर चालताना दिसतात, हे देखील चुकीचे असून एखादा अपघात झाल्यास पादचाऱ्यांची चूक मानली जाईल, असे दक्षिण गोवा सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय रस्ते विभागाने गांधीनगर व बोगदा येथे फलक उभारून सूचित केले आहे. तरीही या उड्डाण पुलावरून नागरिक चालताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com