Goa Crime News |Woman politician harassment Dainik Gomantak
गोवा

Goa: कोरगाव पंचायत महिला सदस्याचा विनयभंग! आमदार, पोलिस प्रकरण दाबत असल्याचा आरोप; बापलेकाविरोधात अद्याप 'नो अ‍ॅक्शन'

Pernem Goa Crime News: पोलिस संरक्षणात हे झाड कापण्यासाठी सरकारी यंत्रणा गेली असता उदय प्रभुदेसाई आणि त्यांचा मुलगा उगम यांनी झाड कापणाऱ्या व्यक्तींना अडथळा आणत महिलेचा विनयभंग केला होता.

Pramod Yadav

मोरजी: कोरगाव पंचायतीच्या महिला सदस्याचा विनयभंग केल्याची घटना मे महिन्यात उघडकीस आली. याप्रकरणी बापलेकाविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. पण, एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने पंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, हे प्रकरण दाबण्याचा स्थानिक आमदार आणि पोलिस प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पीडित महिला पंचायत सदस्याला अद्याप न्याय मिळाला नसल्याने कोरगाव पंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेद्वारे नाराजी व्यक्त केली. तसेच, स्थानिक आमदार या प्रकरण हस्तक्षेप करुन ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पंचायत सदस्यांनी केला आहे.

भाईड-कोरगाव येथील वयस्कर महिला चंपावती धारगळकर यांच्या घरावर असलेले झाड धोकादायक स्थितीत होते. हे झाड कापण्यासाठी या महिलेने कोरगाव पंचायतीकडे अर्ज केला होता.

पंचायतीने आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत त्याची माहिती पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाला दिली होती. उपजिल्हाधिकारी कार्यालयाने हे झाड कापण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस संरक्षणात हे झाड कापण्यासाठी सरकारी यंत्रणा गेली असता तेथे उदय प्रभुदेसाई आणि त्यांचा मुलगा उगम यांनी झाड कापणाऱ्या व्यक्तींना अडथळा आणला. तसेच झाड कापण्यासाठी मज्जाव केला.

उदय प्रभुदेसाई आणि त्यांचा मुलगा उगम प्रभुदेसाई यांनी महिला पंचायत सदस्याशी हुज्जत घातली तसेच, सरकारी कामात व्यत्यय आणून महिलेचा विनयभंग केला असा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून, बापलेकाविरोधात १० मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण, एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून देखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संशयितांना अटक करण्याची मागणी उपसरपंच दिवाकर जाधव यांनी केली आहे.

स्थानिक आमदार आणि पोलिस देखील हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालून महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी उपसरपंच दिवाकर जाधव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT