IFFI 2023  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: कोकणी, मराठी सिनेमाला स्‍थान नाही

IFFI 2023: इंडियन पॅनोरमा : 25 फिचर, 20 नॉन फिचर फिल्म; 408 प्रवेशिका

दैनिक गोमन्तक

IFFI 2023: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या 25 फिचर फिल्म आणि 20 नॉन फिचर फिल्मची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे.

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या काळात होत असलेल्या 54 व्या इफ्फीत इंडियन पॅनोरमाच्या मुख्य विभागात एकही कोकणी व मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला नाही.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीने (एनएफडीसी) इंडियन पॅनोरमाचे आयोजन केले जाते. इंडियन पॅनोरमाअंतर्गत सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर, नॉन फिचर फिल्मची निवड केली जाते.

‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतातील सिनेजगतातील नामवंत व्यक्तींमार्फत केली जाते. यात फिचर फिल्मसाठी एकूण बारा सदस्य, तर नॉन-फिचर फिल्मसाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात.

यंदाच्या फिचर फिल्म ज्युरींचे नेतृत्व अभिनेते आणि निर्माते डॉ. टी. एस. नागभरणा यांनी केले. या बारा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसेच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधित्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्मच्या वर्गवारीकरता एकूण 408 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण 25 चित्रपटांचे पॅकेज निवडण्यात आले आहे. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत. यात एकही कोकणी व मराठी चित्रपट नाही.

लघुपटात सुयश कामत यांचा ‘सदाबहार’

इंडियन पॅनोरमा विभागाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या नॉन फिचर फिल्ममध्ये 239प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 लघुपटांची निवड करण्यात आली. या लघुपटांमधून भारतातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या एखाद्या विषयाचे ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण, संशोधन करणे आणि त्याचवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासंबंधीच्या क्षमतेचे दर्शन घडते. यात कोकणीतील सुयश कामत यांचा ‘सदाबहार’ हा लघुपट दाखविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT