Bandra Terminus - Madgaon Express Konkan Railway
गोवा

Bandra - Madgaon Express: कोकणासाठी रेल्वे मागतोय तुम्ही गोव्यासाठी देताय? वांद्रे-मडगाव एक्सप्रेसबाबत कोकणवासीय नाराज

Bandra Terminus - Madgaon Express: कोकण रेल्वेने कोकणी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे संघटनेने म्हटलंय.

Pramod Yadav

Bandra Terminus - Madgaon Express

मुंबई: मुंबईतून गोव्याला जाणारी नवी ट्रेन सुरु करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून गोव्यासाठी धावणाऱ्या या ट्रेनबाबत कोकणवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेसचे थांबे आणि वेळापत्रक यावरुन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने वसई सावंतवाडी पॅसेंजर अथवा स्लो मधू दंडवते एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात आहे. पॅसेंजर ट्रेनची मागणी असताना सुपरफास्ट ट्रेन का देण्यात आली शिवाय त्यांचे थांबे देखील सर्व कोकणवासीयांच्या फायद्याचे नाहीत, अशा शब्दात संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तुम्ही गोव्यासाठी देताय? रात्रीसाठी ट्रेनची मागणी असताना तुम्ही दिवसा सुरु केली. वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेसचे कोकणासाठी केवळ सात रेल्वे स्थानकासाठी थांबे देण्यात आले असून, कोकण रेल्वेने कोकणी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे संघटनेने म्हटलंय.

महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी २२ टक्के गुंतवणूक केली त्यांच्या वाट्याला केवळ मध्य रेल्वेच्या तीनच गाड्या आल्या आहेत. वांद्रे - मडगाव एक्सप्रेस पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवण्याची मागणी संघटनेने केली आहे.

नव्याने सुरु झालेल्या वांद्रे टर्मिनस - मडगाव एक्सप्रेसला रत्नागिरी सिंधुदुर्गातील ३४ रेल्वे स्थानकांवर थांबाच दिलेला नाही, असेही संघटनेने म्हटले आहे.

वांद्रे टर्मिनस - मडगाव एक्सप्रेस नियमित सुरु करुन एक जनरल डब्बा वसई रोड स्टेशनसाठी राखीव ठेवावा. तसेच, किमान एका तालुक्यासाठी थांबा देण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? असा सवाल देखील संघटनेने उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT