arrested Dainik Gomantak
गोवा

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Konkan Railway Theft: धावत्या रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली.

Manish Jadhav

Konkan Railway Police: कोकण रेल्वे पोलिसांना एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. धावत्या रेल्वेतील प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली. या आरोपीचे नाव श्रीशांत राठोड (वय 29, रा. जुआरी नगर, बिर्ला) असे आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल 12.57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरीच्या अनेक घटनांचा छडा

गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावरील धावत्या गाड्यांमध्ये प्रवाशांचे सामान चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. रेल्वेतील प्रवासी विशेषतः झोपलेले असताना त्यांना लक्ष्य केले जात होते. या वाढत्या घटनांमुळे कोकण रेल्वे पोलिस सतर्क झाले होते आणि त्यांनी या चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला जुआरी नगर परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, आरोपीकडून पोलिसांनी (Police) चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 12 लाख 57 हजार इतकी आहे. यात 10 लाख 87 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेला हा मुद्देमाल वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमधील असल्याची माहिती आहे. यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आणखी एका साथीदाराचा शोध सुरु

पोलिसांच्या चौकशीत आरोपी (Accused) हा एकटाच चोरी करत नव्हता, तर त्याचा एक साथीदारही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी काही चोरीच्या घटनांचा छडा लागण्याची आणि या टोळीच्या कामाचा आवाका समोर येण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी प्रवाशांना केले. या घटनेमुळे भविष्यात अशा चोरीच्या घटनांवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT