Konkan Railway Police Dainik Gomantak
गोवा

कर्नाटकात घरफोडीचे अनेक गुन्हे, सराईत चोरटे गोव्यात आले अन् कोकण पोलिसांच्या जाळ्यात अडकले

संशयितांची माहिती कर्नाटक पोलिसांकडून गोवा पोलिसांना देण्यात आली होती.

Pramod Yadav

घरफोडीच्या विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्या म्हैसूर, कर्नाटक येथील दोघांना मडगाव रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कर्नाटक राज्यात दोघांवर विविध घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

अशोक कृष्णाप्पन कुमार (वय 27) आणि मधु कृष्णाप्पन कुमार (वय 25) (दोघेही रा. बीएमसी नगर, म्हैसूर)अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांवर घरफोडीचे अनेक दाखल आहेत. म्हैसूर न्यायालयाने संशयिकातांना अटक करून हजर करण्याचे आदेश दिले होते. संशयितांची माहिती कर्नाटक पोलिसांकडून गोवा पोलिसांना देण्यात आली होती.

दरम्यान, दोघे संशयित कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वे स्थानकावर दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक केली. अटक संशयितांना म्हैसूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज मांद्रेकर, पोलीस शिपाय सत्यवान नाईक व सत्यवान गावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

SCROLL FOR NEXT