Kolhapur-Panaji Bus Accident At Mopa  Dainik Gomantak
गोवा

Kolhapur-Panaji Bus Accident: कोल्हापूर-पणजी खासगी बसला अपघात; प्रवासी झोपेत असताना अचानक...

मोपाजवळ घटना

Akshay Nirmale

Kolhapur-Panaji Private Bus Accident: कोल्हापुरहून पणजीकडे येत असलेल्या खासगी स्लीपर बसला (एमएच 09 एफएल 1526) बुधवारी पहाटे अपघात झाला. उत्तर गोव्यातील मोपाजवळ मुख्य रस्त्यावर पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तथापि, अचानक झालेल्या या प्रकारामुळे भीतीने बसमधील सर्वच प्रवाशांची गाळण उडाली होती. अपघातावेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत होते.

बस ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस अचानक सिमेंटच्या मुख्य रस्त्यावरून खाली उतरली. त्यामुळे अर्धी बस सिमेंटच्या रस्त्यावर आणि अर्धी बस खाली अशी बसची अवस्था होती. त्याच अवस्थेत बस बंद पडली.

अचानक मोठा आवाज होऊन बस बंद पडल्याने बसमधील प्रवासी हादरले.

अनेक प्रवासी झोपेत होते. त्यामुळे कुणालाही नेमके काय घडले याची कल्पना नव्हती. आवाजाने मात्र सर्वांचीच तारांबळ उडाली. क्लिनर-ड्रायव्हरने सर्वांना शांतपणे खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर सर्वजण बसबाहेर पडले.

बस तशीच अर्धवट कलंडलेल्या अवस्थेत थांबून होती. पाऊस नसल्याने प्रवाशांचे फार हाल झाले नाहीत. पण त्यांना गोव्याकडे येण्यासाठी इतर वाहनांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर हायवेवरील इतर खासगी बसेस आणि महाराष्ट्र शासनाच्या बसेसमधून प्रवासी गोव्याकडे आले.

जिथे अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. चार पदरी रस्त्यापैकी एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. ते काम सुरू आहे.

त्यामुळे त्यातील एकच सिमेंटच्या रस्त्याची लेन वाहतुकीसाठी खुली होती. सिमेंटच्या रस्त्याला लागून दुसऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे येथे काही प्रमाणात चिखलही होता. त्यामुळे ड्रायव्हरला अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT