Khotigao Forest Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Green Zone: खोतीगावावर हरित क्षेत्राचे संकट! 1700 नागरिकांच्या अस्तित्वाची लढाई; 80 टक्के जमीन 'ग्रीन झोन' घोषित झाल्याने नागरिक चिंतेत

Khotigao Forest Issue: खोतीगावातील सुमारे ८० टक्के क्षेत्र हरित क्षेत्र म्हणून नोंद झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

काणकोण: खोतीगावातील सुमारे ८० टक्के क्षेत्र हरित क्षेत्र म्हणून नोंद झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या क्षेत्रात सुमारे ५०० घरे असून जवळपास १,७०० लोकसंख्या वास्तव्यास आहे. हरित क्षेत्राची नोंद पुढे आरक्षित जंगलात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त करत येथील रहिवाशांनी याविरोधात आवाज उठवला आहे.

या प्रश्नासंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक शुभम कोमपंत आणि माजी सरपंच मनोहर वेळीप यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, हरित क्षेत्र आरक्षित जंगल म्हणून घोषित झाल्यास स्थानिक नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

यापूर्वी खोतीगाव अभयारण्याची निर्मिती झाली तेव्हा नडके आणि येंड्रे वाड्यांतील रहिवाशांना दाबेल येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ती प्रक्रिया आजतागायत पूर्ण झालेली नाही. खोतीगावातील नागरिकांमध्ये भविष्यातील संभाव्य निर्बंध, विकासकामांवरील मर्यादा आणि स्थलांतराच्या शक्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण असून सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

वस्तुस्थिती लक्षात घ्या!

मनोहर वेळीप म्हणाले, उपलब्ध कागदपत्रांनुसार येथील रहिवासी १७९० सालापासून या परिसरात वास्तव्यास आहेत. हरित क्षेत्र म्हणून दाखविण्यात आलेल्या भागात अनेक कुटुंबे पिढ्यांपिढ्या राहत असून तेथे देवालये, पवित्र स्थाने आणि पारंपरिक सांस्कृतिक वारसाही आहे. त्यामुळे स्थानिकांच्या अस्तित्वाशी निगडित हा प्रश्न असून सरकारने वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT