Khapreshwar Temple  Dainik Gomantak
गोवा

Khapreshwar Porvorim: खाप्रेश्वराच्या मूर्तीचे गुपचूप स्थलांतर; "आता वडाकडे अशे काय उरोंक ना" पर्वरीवासियांकडून निषेध

Porvorim Banyan Tree Translocation: पर्वरीतील खाप्रेश्वराच्या मूर्तीच्या स्थनांतराने स्थानिकांचा भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्याकडून राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय.

Akshata Chhatre

Porvorim Khapreshwar Temple Relocation

पर्वरी: नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या चार जुन्या झाडांचे स्थानांतर करण्याचा विचार सुरु आहे, त्यांपैकीच एक म्हणजे एनएच ६६ महामार्गाच्या विस्तारासाठी पर्वरी येथे २ शतकांपासून उभ्या असलेल्या जुन्या वटवृक्षाच्या स्थलांतराला रविवार (दि.२ मार्च) पासून सुरुवात झाली आहे आणि सोबतच शेजारी असलेल्या खाप्रेश्वर मंदिराला देखील हटवले गेले आहे. पर्वरीतील खाप्रेश्वराच्या मूर्तीच्या स्थनांतराने स्थानिकांचा भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्याकडून राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय.

जय महाभारत पक्षाच्या गोवा संघाचे अध्यक्ष अरवंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या पहाटे पर्वरीतील खाप्रेश्वराची मूर्ती मंदिरातून स्थानांतरित करण्यात आली. चोरीये येथील मंदिरातून भल्या पहाटे या मूर्तीचे स्थानांतर केले गेल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. स्थानिकांच्या मनाविरूद्ध राज्यसरकारच्या या निर्णयाचा केवळ निषेध केला जाऊ शकतो असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खावंटे यांचा देखील आम्ही निषेध करतो अशी रोखठोक प्रतिक्रिया मांडली.

स्थानिकांनी दिलेली माहितीनुसार मुख्यमंत्र्यांकडून या मंदिराच्या स्थानांतवर स्थगिती आणण्यात आली होती आणि वेगळ्या जागी मंदिराची स्थापना केली जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले होते, मात्र भल्या पहाटे ३-४च्या सुमारास मंदिरातील मूर्तीला हलवण्यात आले. आता ही मूर्ती नेमकी कुठे आहे याची माहिती स्थानिकांना नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाकडून केवळ वडाचे झाड हटवण्याचा निर्णय देण्यात आला होता मात्र मंदिरातील मूर्ती हटवून मंदिरस्थानांतर करणे हे बरोबर नाही. पर्वरी येथील खाप्रेश्वर देवस्थानाच्या ढासळणीला विरोध करण्यासाठी कालपासूनच मोठी गर्दी जमली असल्याने घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वृक्षाचे स्थलांतर आणि देवस्थानाच्या संभाव्य ढासळणीला स्थानिकांचा तीव्र विरोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT