Porvorim Banyan Tree: "हांव खाप्रेश्वराक हात लावपाक दिवचे ना!" पर्वरीत 2 शतकांपासून उभ्या असलेल्या जुन्या वटवृक्षाचे स्थलांतर सुरू

Banyan Tree Translocation: एनएच ६६ महामार्गाच्या विस्तारासाठी पर्वरी येथे २ शतकांपासून उभ्या असलेल्या जुन्या वटवृक्षाच्या स्थलांतर
Porvorim banyan tree
Porvorim banyan treeDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Old Banyan Tree Relocation

पर्वरी: नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या चार जुन्या झाडांचे स्थानांतर करण्याचा विचार सुरु आहे, त्यांपैकीच एक म्हणजे एनएच ६६ महामार्गाच्या विस्तारासाठी पर्वरी येथे २ शतकांपासून उभ्या असलेल्या जुन्या वटवृक्षाच्या स्थलांतर. वडाकडे, पर्वरीत रविवारी (दि. ३ मार्च) पासून या वृक्षाच्या स्थानांतराला सुरुवात झालीये. सोबतच शेजारी असलेल्या खाप्रेश्वर मंदिराला देखील हटवले जाणार आहे. उच्च न्यायालयाने या स्थलांतरास मान्यता दिल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली, मात्र स्थानिक याला विरोध दर्शवत असून पर्वरी येथे मोठी गर्दी जमली आहे.

पर्वरीत अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या वटवृक्षाच्या स्थानांतरबद्दल बोलताना, स्थानांतराच्यावेळी वन अधिकारी सदर प्रक्रियेची देखरेख करणार असून यादीत नमूद केलेल्या सर्व सावधगिरीचे पालन केले जाईल, असे महाधिवक्ता देवीदास पंगम यांनी स्पष्ट केले होते. मात्र, सुकूरमधील पूरग्रस्त पडीक जमिनीवर प्रस्तावित स्थलांतराबाबत पर्यावरणवाद्यांनी आणि स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवायला सुरुवात केलीये.

Porvorim banyan tree
Porvorim Goa: वटवृक्ष जगवण्यासाठी सुरुये अखंड धडपड! एकाची आशा जिवंत, दुसऱ्याने दम तोडला; अहवाल

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चिंता व्यक्त करत ते मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्तक्षेपासाठी मागणी करत आहेत.दरम्यान, पर्वरी येथील खाप्रेश्वर देवस्थानाच्या भागातील ढासळणीला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी जमली असून, घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वृक्षाचे स्थलांतर आणि देवस्थानाच्या संभाव्य ढासळणीला स्थानिकांचा तीव्र विरोध सुरू आहे.

आम्हाला कोणत्याच प्रकारचे राजकारण नकोय

पर्वरीत राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल केली जात आहे. आम्हालाही हा रस्ता हवा आहे, परंतु आमची आस्था असलेल्या खाप्रेश्‍वर देवस्थान आणि वडाला हानी पोहोचवून आम्हाला हा विकास नको, असे स्थानिक शंकर फडते यांनी सांगितले. संदर्भात खासदार श्रीपाद नाईक तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना भेटलो असता त्यांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींना यात राजकीय तोटा दिसत आहेत, आम्ही राजकारण करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमचा विरोध हा केवळ खाप्रेश्‍वर मंदिर तसेच वडाला राखण्यासाठी असून यासंबंधी आम्हाला कोणत्याच प्रकारचे राजकारण नकोय, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com